Anil Babar : शिंदे गटाच्या आमदाराचे निधन
एकनाथ शिंदे यांचे विश्वासू असलेले आमदार अनिल बाबर यांचे निधन झाल्याची घटना समोर आली आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
ADVERTISEMENT
Anil Babar Passed Away : स्वाती चिखलीकर, सांगली : महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाल्याचे वृत्त हाती आले आहे. अनिल बाबर (Anil Babar) यांना न्युमोनियाची लागण झाली होती. रूग्णालयात उपचार सुरु असताना वयाच्या 74 व्या वर्षी अनिल बाबर यांची प्राणज्योत माळवली आहे. अनिल बाबर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांचे विश्वासू आमदार आणि विश्वासू साथीदार अशी त्यांची ओळख होती. या घटनेने आता बाबर कुटुंबावर आणि शिंदे गटावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच राजकीय वर्तुळात देखील हळहळ व्यक्त होते आहे. (anil babar passed away eknath shinde group mla shiv sena maharashtra politics)
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे यांचे विश्वासू असलेले आमदार अनिल बाबर यांचे निधन झाल्याची घटना समोर आली आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अनिल बाबर यांची काल दुपारपासून प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी सांगलीतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी बाबर यांना न्युमोनियाची लागण झाल्याचे समोर आले होते. या दरम्यान उपचार सुरू असताना अनिल बाबर यांची प्राणज्योत माळवली.
हे ही वाचा : शिंदे गटाचा ठाकरेंवर गंभीर आरोप, थेट पोलिसातच तक्रार; नेमकं प्रकरण काय?
अनिल बाबर हे दोन दिवसापूर्वीचे शंभूराज देसाई यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यात उपस्थित होते. त्यानंतर आज त्यांच्या निधनाचे वृत्त हाती आले आहे. त्यामुळे अनिल बाबर यांच्या निधनाने बाबर कुटुंबियांवर आणि शिंदे गटावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
हे वाचलं का?
मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल बाबर यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. अतिशय वाईट आणि वेदनादायी देणारी ही बातमी आहे. अत्यंत विश्वासू , एकनिष्ट आणि आपल्या कामाशी, मतदारांशी प्रामाणिक असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. पर्वाच आम्हाला ते एका कार्यक्रमात ते भेटले होते. त्यामुळे ही अतिशय मनाला चटका लावणारी बातमी आहे.
प्रामाणिक काम करणारा, आपल्या कामाशी काम ठेवणारा, मतदारांसाठी आणि मतदारसंघासाठी सतत पाठपुरावा करणारा, स्वत:साठी त्यांनी कधीच काही मागितले नाही. पण मतदारांसाठी आणि मतदारसंघासाठी त्यांनी फार प्रयत्न केले आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठपुराव्याला यश आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतात. त्यांच्या कुटुंबियांना या दु:खातून सावरण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझे सहकारी अनिल बाबर यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : ‘मविआ’ने तो निर्णय घेतला! प्रकाश आंबेडकरांना दिलं पत्र
दरम्यान जेष्ठ आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे आजची राज्य मंत्री मंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे. त्याचसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेष्ठ दिवंगत आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ठाण्याकडून हेलिकॅाप्टरने थोड्याच वेळात आटपाटीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
कोण आहेत अनिल बाबर?
सांगली जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदार संघातून अनिल बाबर यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत अनिल बाबर यांना 1 लाख 16 हजार 974 मते पडली होती. तर त्यांच्याविरूद्ध निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या अपक्ष सदाशिवराव पाटील यांना 90 हजार 683 मते मिळाली होती. त्यामुळे 26 हजार 291 मतांनी अनिल बाबर यांनी सदाशिवराव पाटील यांचा पराभव करत निवडणूक जिंकली होती.
शिवसेनेचे अनिल बाबर हे सांगली जिल्ह्यातील एकमेव आमदार होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती. टेंभू योजनेचे पाणी दुष्काळी आटपाडी तालुक्याला मिळवण्यात बाबर यांच्या फार मोठा वाटा आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना असा राजकीय प्रवास करत असताना नेहमी दुष्काळी भागातील प्रश्नांसाठी आक्रमकपणे लढा देणारा नेता अशी बाबर यांची ओळख होती. आमदार अनिल बाबर यांच्या जाण्यामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT