Beauty Tips: दररोज अंघोळ तरीही ‘हे’ 6 अवयव राहतात घाणेरडेच

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

beauty tips daily take bath but 6 body parts arent washing properly what are these
beauty tips daily take bath but 6 body parts arent washing properly what are these
social share
google news

सध्याच्या धावपळीच्या जीवनात कुणालाच स्वत:ची काळजी घेण्यासाठी वेळ नाही आहे. सकाळच्या अंघोळीपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व एकदम विस्कळीत असतं. असं पाहायला गेले तर आपण दररोज अंघोळ करतो, पण तरीही देखील आपल्या शरीरातील हे 6 अवयव घाणेरडे राहतात. कारण झटपट अंघोळीच्या नादात हे अवयव स्वच्छच होते नाही. त्यामुळे त्या ठिकाणी घाण साचून राहते. मग त्याचं अवयवांना साफ करण्यासाठी आपण महागड्या प्रोडक्टचा वापर करतो. पण जर तुम्ही अंघोळी करताना या अवयवांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले तर ही वेळ येणारच नाही. त्यामुळे हे अवयव कोणते आहेत, हे जाणून घेऊयात. (beauty tips daily take bath but 6 body parts arent washing properly what are these)

नाभी

नाभी म्हणजेच बेंबीच्या स्वच्छतेकडे लोक जास्त लक्ष देत नाही. कारण तो शरीरातला लपलेला हिस्सा असतो. जर कुणी तो हिस्सा स्वच्छ जरी करत असेल तरी देखील तो चुकीच्या पद्धतीने साफ करतो. खरं तर नाभीला आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ केले पाहिजे. यासाठी कापसाचा वापर करा. आणि कापूस जिथपर्यंत नाभीतून स्वच्छ होऊन बाहेर पडत नाही, तिथपर्यंत स्वच्छता करत राहा.

कानातला मळ

कानातला मळ जर व्यवस्थित काढला नाही तर संसर्ग होऊ शकतो. पण कानाची स्वच्छता हेअरपिन किंवा नखांनी करणे टाळली पाहिजे. त्याऐवजी बेबी ऑईल, मिनरल ऑईल किंवा ग्लिसरीनने आरामात कानाची स्वच्छता करता येते. याचे एक-दोन थेंब कानात टाकावीत त्यानंतर दोन दिवसांनी गरम पाण्यात दोन-तीन थेंब टाकून मान वाकवा. ज्यामुळे पाण्यासोबत घाण देखील निघून जाईल. त्यानंतर टॉवेलाने कान व्यवस्थित स्वच्छ करून घ्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी तुटण्याचा धोका? समजून घ्या 5 संकेतांचे अर्थ

जीभ

जीभ स्वच्छ करण्याची सर्वात चांगली पद्धत म्हणजे, त्याला टंगक्लिनर खरवडणे. ही प्रक्रिया तुम्ही दररोज केली पाहिजे. म्हणते दातासोबत जीभ देखील साफ केली पाहिजे.

कोपरा

जर तुमच्या हाताचा कोपरा काळा असेल तर त्वचेच्या मृत पेशींचा त्याचावर परिणाम होतो. त्यामुळे कोपरा देखील स्वच्छ करण्याची गरज आहे. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा एक्सफोलिएट करण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही तुमचा घरगुती स्क्रब वापरू शकता किंवा स्टोअरमधून खरेदी करू शकता. स्क्रब लावा आणि गोलाकार हालचालीत हळुहळु घासून घ्या.

ADVERTISEMENT

स्काल्प

स्काल्पवर हेअर प्रोडक्ट्सच्या वापरामुळे घाण साचू शकते. ही घाण साफ करण्यासाठी शॅम्पूचा वापर करण्यापूर्वी केसांना व्यवस्थितपणे धुवून घ्या. त्यानंतर शॅम्पूला पाण्यात मिसळा आणि स्काल्पवर लावून घ्या. जर तुम्ही कंडीश्नर वापरत असाल, तर ते केसांच्या टोकांनाही लावा.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Nanded : नांदेडच्या रुग्णालयात मृत्यूचा थयथयाट! 12 नवजात बालकांसह 24 रुग्णांचा मृत्यू

पाठ

जेव्हा शरीराच्या स्वच्छतेचा प्रश्न येतो, तेव्हा पाठीची साफसफाई करणे सर्वात कठीण काम असते. पाठ स्वच्छ करण्यापूर्वी प्रथम कोरड्या ब्रशने पाठ स्वच्छ करा. नंतर गोलाकार हालचालींमध्ये घासण्यासाठी लांब एक्सफोलिएटिंग बँड वापरा. तुमची पाठ रोज स्वच्छ करा जेणेकरून तिथली त्वचा गुळगुळीत राहते आणि त्यावर मृत त्वचा जमा होणार नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT