आयुष्मान भारत योजनेत घोटाळा! मृतांवर उपचार, एकाच मोबाईलवर…, कॅगचा मोठा खुलासा

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

the Comptroller and Auditor General (CAG) of the country has made a shocking disclosure on Ayushman Bharat scheme
the Comptroller and Auditor General (CAG) of the country has made a shocking disclosure on Ayushman Bharat scheme
social share
google news

Ayushman bharat scam : देशातील गरजूंना उपचार सुविधा देण्यासाठी केंद्राने सुरू केलेल्या आयुष्मान भारत योजनेतील मोठा घोळ समोर आला आहे. महत्त्वाचे म्हणजे देशाचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) यांनी योजनेतील गैरप्रकार समोर आणला आहे. या योजनेबाबत जारी केलेल्या लेखापरीक्षण अहवालात कॅगने सांगितले आहे की, ज्या लोकांचा मृत्यू झाला, तेही उपचार घेत असल्याचे दाखवले गेले आहे. एवढेच नाही तर AB-PMJY योजनेचे 9 लाखांहून अधिक लाभार्थ्यांचा मोबाईल क्रमांक एकच आहे.

ADVERTISEMENT

ज्यांचा खूप आधीच मृत्यू झाला आहे, त्या व्यक्तींना या योजनेंतर्गत उपचार घेताना दाखवण्यात आले आहे. ऑडिटमधून हे समोर आले आहे. TMS मधील मृत्यू प्रकरणांच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यावर असे दिसून आले की आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचारादरम्यान 88,760 रुग्णांचा मृत्यू झाला. या रूग्णांच्या संदर्भात नवीन उपचारांशी संबंधित एकूण 2,14,923 दावे सिस्टीममध्ये सशुल्क म्हणून दाखवण्यात आले आहे.

लेखापरीक्षण अहवालात पुढे असे म्हटले आहे की, वरील दाव्यांच्या जवळपास 3,903 प्रकरणांमध्ये दाव्याची रक्कम रुग्णालयांना अदा करण्यात आली. त्यापैकी 3,446 रुग्णांशी संबंधित निधी 6.97 कोटी रुपये होता.

हे वाचलं का?

या पाच राज्यांमध्ये झाली सर्वाधिक हेराफेरी

मृत व्यक्तींवर उपचाराचा दावा केल्याची सर्वाधिक प्रकरणे देशातील पाच राज्यांमध्ये दिसून आली आहेत. यामध्ये छत्तीसगड, हरियाणा, झारखंड, केरळ आणि मध्य प्रदेशचा समावेश आहे. कॅगच्या अहवालात असे म्हटले आहे की राज्य आरोग्य संस्था (SHA) द्वारे आवश्यक चाचण्यांची पडताळणी न करता अशा प्रकरणात पैसे दिले गेले आहे.

लेखापरीक्षणातील आकडेवारीचे विश्लेषण केले असता, या योजनेचा एकच लाभार्थी एकाच वेळी अनेक रुग्णालयात दाखल झाल्याचेही आढळून आले. जुलै 2020 मध्ये राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (NHA) देखील हा मुद्दा अधोरेखित केला आहे.

ADVERTISEMENT

वाचा >> असं काय घडलं की, राहुल गांधींनी ‘फ्लाइंग किस’ दिला? लोकसभेत झाला प्रचंड गोंधळ

NHA ने म्हटले होते की, ही प्रकरणे अशा परिस्थितीत येतात जेव्हा एका रुग्णालयात बाळाचा जन्म होतो आणि आईच्या PMJAY आयडीचा वापर करून नवजात बालकांच्या काळजीसाठी दुसऱ्या रुग्णालयात स्थानांतरित केले जाते.

ADVERTISEMENT

परंतु कॅगच्या तपासणीत असे दिसून आले आहे की, डेटाबेसमध्ये 48,387 रूग्णांचे 78,396 दावे आढळून आले आहेत, ज्यामध्ये या रूग्णांना पहिल्या उपचारासाठी सोडण्याची तारीख त्याच रूग्णाच्या दुसर्‍या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याच्या तारखेपेक्षा नंतर होती. अशा रुग्णांमध्ये 23,670 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

एका मोबाईल क्रमांकावर अनेक लाभार्थ्यांची नोंदणी

आयुष्मान भारत योजनेबाबत कॅगच्या लेखापरीक्षण अहवालात झालेला दुसरा मोठा खुलासा आश्चर्यकारक आहे. महालेखा परीक्षकांनी सांगितले आहे की, या योजनेंतर्गत लाभ घेणारे लाखो लाभार्थी आहेत, ज्यांचे मोबाईल क्रमांक एकसारखेच आहेत. विशेष म्हणजे या सरकारी योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी मोबाईल क्रमांकाची नोंदणी करणे सर्वात आवश्यक आहे. लाभार्थींनी नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावरूनच त्याची नोंद शोधली जाते.

साधारणपणे, एखाद्या लाभार्थीचा मोबाईल क्रमांक चुकीचा असल्यास किंवा ई-कार्ड हरवले असल्यास, लाभार्थी ओळखणे कठीण होते आणि नंतर योजनेंतर्गत समाविष्ट असलेली रुग्णालये उपचार देण्यास नकार देतात. मात्र येथे मोठी हेराफेरी करण्यात आली आहे.

वाचा >> Rahul Gandhi Speech : “माझी एक आई इथे बसलीये, दुसरीची मणिपूरमध्ये हत्या केली”

या योजनेत नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून नोंदणी डेस्कशी संपर्क साधता येतो आणि त्यासाठी ई-कार्डची आवश्यकता नाही. लाभार्थ्यांची नोंदणी आणि पडताळणीमध्ये गंभीर अनियमितता समोर आल्याचे कॅगच्या अहवालातून समोर आले आहे.

अहवालात असे म्हटले आहे की बीआयएस डेटाबेसच्या डेटाचे विश्लेषण केल्यावर असे आढळून आले की एकाच मोबाईल नंबरवर अनेक लाभार्थ्यांची नोंदणी केली गेली आहे.

तिसऱ्या क्रमांकावर सुमारे 9.85 लाख लोकांनी नोंदणी केली आहे. 9999999999 या मोबाईल क्रमांकावर PMJAY योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून 7.49 लाख लोकांनी नोंदणी केली आहे. कॅगने केलेल्या तपासात असेही समोर आले आहे की या हेराफेरीसाठी वापरल्या जाणार्‍या इतर क्रमांकांमध्ये 8888888888, 9000000000, 20, 1435 आणि 185397 यांचा समावेश आहे.

24.22 कोटी आयुष्मान कार्ड

कॅगचा हा लेखापरीक्षण अहवाल संसदेत मांडण्यात आला. त्यानंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री एसपी सिंह बघेल यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले की, सरकारला एबी-पीएमजेवाय योजनेंतर्गत संशयास्पद व्यवहार आणि संभाव्य फसवणुकीची माहिती आहे. हे शोधण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग (ML) चा वापर केला जात आहे. बघेल म्हणाले की, या तंत्रज्ञानाचा वापर आरोग्य सेवा फसवणूक प्रतिबंध, शोध आणि निवारणासाठी केला जातो. त्यांनी सांगितले की, 1 ऑगस्ट 2023 पर्यंत आयुष्मान भारत योजनेअंतर्गत एकूण 24.33 कोटी कार्ड बनवण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT