Juhu Drowning Incident : जुहूच्या समुद्रात चार मुलं कशी बुडाली?

मुंबई तक

ADVERTISEMENT

cyclone biparjoy how four children drowned in the sea of ​​Juhu
cyclone biparjoy how four children drowned in the sea of ​​Juhu
social share
google news

Juhu Drowning Incident : गेल्या अनेक आठवड्यापासून बिपरजॉय चक्रीवादळाच्या (Cyclone Biparjoy) धोक्याबाबत भारतीय हवामान विभाग देशासह राज्यातील नागरीकांना सतर्कतेच्या सुचना देतेय. खासकरून किनारपट्टी भागातील नागरीकांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र तरी देखील मुंबईतील काही अल्पवयीन मुलांचा ग्रुप सोमवारी जुहु (Juhu) कोळीवाडा येथील समुद्राच्या पाण्यात उतरला होता. या दरम्यान चक्रीवादळामुळे समुद्रात उसळत असलेल्या भल्यामोठ्या लाटांमुळे 5 मुले बुडाल्याची घटना घडली होती. तर सुदैवाने एका स्थानिक मच्छिमाराच्या सतर्कतेमुळे एका मुलाचा जीव वाचवण्यात यश आले होते. दरम्यान 20 तास शोधमोहिम राबवल्यानंतर या मुलांच्या मृतदेहाचा शोध लागला आहे. या मुलांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान ही मुले जुहू किनाऱ्यावर काय करत होती? तसेच समुद्रात कशी बुडाली ? याची संपूर्ण स्टोरी जाणून घेऊयात. (cyclone biparjoy how four children drowned in the sea of ​​Juhu)

मुंबईतील 7-8 जणांचा अल्पवयीन मुलांचा एक ग्रुप सोमवारी दुपारीच जुहू (Juhu) समुद्रकिनारी दाखल झाला होता. समुद्रकिनारी या मुलांनी क्रिकेट खेळण्याचा आणि समुद्राच्या पाण्यात जाण्याचा बेत आखला होता. त्यानुसार या मुलांनी दुपारभर क्रिकेट खेळला त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास समुद्रात उतरले होते. मात्र समु्द्रात जाण्यावरून काही मुलांचा विरोध होता, त्यामुळे 8 मुलांमधील चौघेच पाण्यात उतरले होते. तर इतर चार किनारी उभे होऊन त्यांना पाहत होते.

हे ही वाचा : Cyclone Biparjoy : धडकी भरवणारा वेग! चक्रीवादळ सध्या कुठेय? पहा Live Tracker

समुद्रात आधीच बिपरजॉय चक्रीवादळामुळे (Cyclone Biparjoy) उधाण होते.मोठ-मोठ्या लाटा किनारी धडकत होत्या. त्यात ही मुले धाडस करून समुद्रात उतरली होती. मात्र काही काळ मजा मस्ती केल्यानंतर अचानक लाटांचा वेग वाढत गेला, आणि या वेगात ही चारही मुले वाहून गेली होती. यावेळी किनाऱ्यानजीक असलेल्या एका स्थानिक मच्छीमाराने ही घटना पाहून एका मुलाचा जीव वाचवला, तर इतर मुले लाटांमध्ये वाहुन गेली होती. या घटनेत सुदैवाने बचावलेल्या मुलाचे नाव धर्मेश ताजभारिया (16) होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

20 तासानंतर मृतदेह सापडले

दरम्यान या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देऊन तत्काळ शोधमोहिम राबवण्यात आली होती. भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर देखील शोधमोहिमेत दाखल झाले होते. यावेळी तब्बल 20 तासांच्या अथक प्रयत्नानंतर तीन मुलांचे मृतदेह हाती लागले होते. मनीष योगेश ओगानिया (16), शुभम योगेश ओगानिया (16), धर्मेश वालजी फौजिया (16) असे या समुद्रात बुडुन मृत पावलेल्या मुलांची नावे होती. ही तीनही मुले वाकोल्याचे रहिवाशी होते. यामधील मनीष आणि शुभम हे सख्खे भाऊ होते. या प्रकरणात कुटुंबातील एका व्यक्तीने सांगितले की, शुभम फक्त 15 वर्षाचा होता.घराची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने शुभम रस्त्यावर कांदे-बटाटे विकायचा. मात्र त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

हे ही वाचा : आश्चर्यच! 4 हात-पाय 2 हृदय आणि…., अनोख्या बाळाचा जन्म

 ‘ती’ पोस्ट ठरली शेवटची

या घटनेपुर्वी या मुलांनी रस्त्यावर येऊन एक फोटो काढला होता. या फोटोत 8 ही मुले दिसली होती. या फोटोंची रिल बनवून तरूणांनी इस्टाग्रामवर पोस्ट केली होती. या रीलच्या बॅकग्राऊडला ”जिओ तो हर पल ऐसे जिओ, जैसे की आखरी हो” हे बॉलिवूडचे गाणे लावले होते. आणि या गाण्यांच्या ओळीप्रमाणेच त्या मुलांच्या आयुष्यातला तो क्षण शेवटचा ठरला होता.

ADVERTISEMENT

दरम्यान या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली आहे. एकीकडे हवामान विभागाकडून सतर्कतेच्या सुचना देऊन सुद्धा अशा घटना घडत असल्याने आता संताप व्यक्त होतो आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT