Bank Holiday : डिसेंबरमध्ये तब्बल 18 दिवस बँका बंद, एका क्लिकवर पाहा सुट्ट्यांची यादी

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

december bank holiday 2023 christmas festival saturday sunday holiday
december bank holiday 2023 christmas festival saturday sunday holiday
social share
google news

December Bank Holiday 2023 : नोव्हेंबर महिना संपायला आणि डिसेंबर (December) महिना उजाडायला आजपासून अवघा आठवडा उरलाय. हा आठवडा संपल्यानंतर तुम्हाला बँकेचे कामकाज करण्यास अ़डचण येणार आहे. कारण डिसेंबर महिन्यात तब्बल 18 दिवस बँका बंद असणार आहेत. त्यामुळे डिसेंबरमध्ये  (December Bank Holiday) फक्त 13 दिवसच बँकेचे कामकाज चालणार आहे. या 13 दिवसात तुम्हाला वेळ मिळाला तर ठिक नाही तर तुम्हाला बँकेची कामे करण्यास अडचण येणार आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात नेमक्या कधी-कधी बँका बंद असणार आहेत? हे जाणून घेऊयात. (december bank holiday 2023 christmas festival saturday sunday holiday)

ADVERTISEMENT

डिसेंबर महिन्यात 5 रविवार आणि 2 शनिवार येणार आहेत. त्यामुळे 7 दिवस तर अशाही बँका बंद असणार आहेत. त्यानंतर इतर 11 दिवशी इतर कार्यक्रम आणि सण असल्याने बँका बंद असणार आहे. डिसेंबर महिन्यात तब्बल 18 दिवस बँका बंद असणार आहेत. त्यामुळे डिसेंबरमध्ये फक्त 13 दिवसच बँकेचे कामकाज चालणार आहे. या 13 दिवसातच तुम्हाला बँकेची कामकाज आटपता येणार आहेत.

हे ही वाचा : Deep fake : रश्मिका मंदानानंतर रतन टाटांचा डिपफेक व्हिडिओ व्हायरल, व्हिडीओत काय?

डिसेंबरमध्ये ‘या’ दिवशी बँकांना सुट्टी

1 डिसेंबर : राज्य स्थापना दिवसानिमित्त अरूणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये सुट्टी
3 डिसेंबर : (रविवार) देशातील सर्वच बँका बंद राहणार आहेत.
4 डिसेंबर : गोव्यात सेंट फ्रांसिस जेवियर फेस्टिवलमुळे बँकांना सुट्ट्या असणार आहेत.
9 डिसेंबर : दुसरा शनिवार (बँका बंद)
10 डिसेंबर : (रविवार) देशातील सर्वच बँका बंद राहणार आहेत.
12 डिसेंबर : मेघालयात बँका बंद असणार आहेत.
13 डिसेंबर : सिक्किममध्ये बँका बंद असणार आहेत.
14 डिसेंबर : सिक्किममध्ये बँका बंद असणार आहेत.
17 डिसेंबर : (रविवार) देशातील सर्वच बँका बंद राहणार आहेत.
18 डिसेंबर : मेघालयात बँका बंद असणार आहेत.
19 डिसेंबर : गोव्यात बँकांना सुट्टी असणार आहे.
23 डिसेंबर : चौथा शनिवार (बँका बंद)
24 डिसेंबर : (रविवार) देशातील सर्वच बँका बंद राहणार आहेत.
25 डिसेंबर : क्रिसमसनिमित्त देशातील सर्वच बँका बंद राहणार आहेत.
26 डिसेंबर : मिझोरम, नागालँड आणि मेघालयात सुट्टी
27 डिसेंबर : क्रिसमसनिमित्त मेघालयात सुट्टी
30 डिसेंबर : फक्त मेघालयात सुट्टी
31 डिसेंबर : (रविवार) देशातील सर्वच बँका बंद राहणार आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Crime : लग्नाच्या पहिल्याच रात्री घात, खिरीमध्ये गुंगीचे औषध मिसळून…लग्नघरात काय घडलं?

आंदोलनामुळे सहा दिवस बँका बंद

ऑल इंडिया बँक एम्प्लॉय असोसिएशन देखील 4 डिसेंबर ते 20 जानेवारीपर्यंत आंदोलनाची घोषणा केली आहे. प्रत्येक बँक वेगवेगळ्या दिवशी आंदोलन करणार आहे. त्यामुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT