Viral : हॉट एअर बलूनने हवेतच घेतला पेट; जीव मुठीत घेऊन प्रवाशांच्या उड्या… पण काळाने गाठलचं!
हवेत उडणाऱ्या हॉट एअर बलूनला आग लागल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक बालक भाजला असल्याचीही माहिती आहे.
ADVERTISEMENT
Viral Video | Flying hot air balloon caught fire :
ADVERTISEMENT
हवेत उडणाऱ्या हॉट एअर बलूनला आग लागल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक बालक भाजला असल्याचीही माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमेरिकेला लागून असलेल्या मेक्सिकोमधील ही घटना असल्याच सांगण्यात येत आहे. (Two people died after a fire broke out in a hot air balloon flying in the air)
मेक्सिको सरकारच्या माहितीप्रमाणे, आग लागल्यानंतर फुग्यातील प्रवाशांनी वरुन उडी मारली. याच अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला. मृतांची नावं अद्याप समोर आली नसली तरीही 39 वर्षीय महिला आणि 50 वर्षीय पुरुष असा दोघांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर 1 लहान मुलगाही मोठ्या प्रमाणात भाजून जखमी झाला आहे. त्याचा पायही फ्रॅक्चर झाला आहे.
हे वाचलं का?
Mexico ??
! Breaking news!??
Saturday, April 01, 2023, in the morning hours.
a hot air balloon catches fire and collapses in Teotihuacan, 2 people are reportedly dead.
The events occurred this morning in the vicinity of the Pyramid of the Sun and the area was cordoned off. pic.twitter.com/DlzJdv2oHH
— Lenar (@Lerpc75) April 1, 2023
मेक्सिको सिटीच्या ईशान्येला 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या टिओतिहुआकान पुरातत्व स्थळावरून हा फुगा उंचावर उडत होता. हॉट एअर बलूनच्या सवारीची आवड असलेले लोक मोठ्या संख्येने इथं येत असतात.
ADVERTISEMENT
हेही वाचा : VIDEO : लग्नमंडपातला स्टंट नवरीला महागात पडला, संपूर्ण तोंडच….
ट्विटरवर @Lerpc75 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, हवेत उडणाऱ्या एका गरम हवेच्या फुग्याला अचानक आग त्यात प्रवासी होते, अचनाक लागलेल्या या आगीनंतर भीतीपोटी दोघांनी उडी मारली. तर खाली उपस्थित असलेले लोकही हे दृष्य पाहून ओरडू लागले होते. एकूणच हे दृश्य अत्यंत भयावह होते.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Mumbai Viral Video : दोन मुलींसोबत तरूणाचा बाईकवर जीवघेणा स्टंट, पोलिसांकडून शोध सुरु
दरम्यान, व्हिडिओ पोस्ट केल्यापासून, आतापर्यंत 15 हजारांहून अधिक व्हूज मिळाले आहेत. तसंच शेकडो लोकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने म्हटलं की, भयानक दृश्य होते. तर दुसऱ्या युजरने सेवा देणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. तिसर्याने लिहिले,अशा साहसी गोष्टींमध्ये धोका असतोच.
यापूर्वीही न्यू मॅक्सिकोमध्ये असाच एक प्रकार घडला होता. गतवर्षी 4 ऑक्टोबरला न्यू मेक्सिकोच्या अल्बुकर्क येथे बलून फिएस्टाच्या 50 व्या वर्धापन दिनाच्या दिवशी एका खांबाला आदळून एका हॉट एअर बलूनला हवेतच आग लागली होती. सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT