10 पैकी 7 नागरिक मांसाहारी! नॉन वेजिटेरीयन शाकाहारींचा इतका राग का करतात?
देशात शाकाहारी आणि मांसाहारी लोकांमधला वाद काही नवीन नाही. हा वाद नेहमीच देशातील युनिवर्सिटी आणि सोसायटीत पाहायला मिळतो.देशात किती टक्के लोक मांसाहार करतात? यामध्ये महिलांचे आणि पुरुषांचे प्रमाण किती? तसचे शाकाहारी आणि मांसाहारी वाद काय आहे, हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
देशात शाकाहारी आणि मांसाहारी लोकांमधला वाद काही नवीन नाही. हा वाद नेहमीच देशातील युनिवर्सिटी आणि सोसायटीत पाहायला मिळतो. आयआयटी मुंबई असो किंवा दिल्ली युनिवर्सिटी असो यामध्ये मांसाहारांचे कॅटीन शाकाहारी विद्यार्थ्यांच्या कॅंटीनपासून वेगळे करण्याची मागणी अनेकदा होत असते. या सर्वात आता देशात किती टक्के लोक मांसाहार करतात? यामध्ये महिलांचे आणि पुरुषांचे प्रमाण किती? तसचे शाकाहारी आणि मांसाहारी वाद काय आहे, हे जाणून घेऊयात. (food contoversy meat eating population in india vegetarian and non vegetarian debate)
ADVERTISEMENT
शाकाहारी-मांसाहारी वाद होत असताना आता एक सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेत शाकाहारी नागरीकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने समोर आले आहे. नेशनल फॅमिली हेल्थ सर्वे 5 नुसार लक्षद्वीपमध्ये जवळपास 100 टक्के लोक मांसाहारी आहेत.
सर्वाधिक मांसाहार कोणत्या राज्यात?
सर्वाधिक मांसाहार करणाऱ्या राज्यात पहिल्या क्रमांकावर अंदमान निकोबारचा नंबर येतो, या राज्यात 99.5 टक्के लोक मांसाहार करतात. यानंतर नागालॅंड, मिझोरम, अरूणाचल, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा आणि आसाममध्ये 99 टक्के लोक मांसाहारी आहेत. यानंतर दक्षिणेतील राज्य येतात. बंगालमध्ये मांसाहारी प्रेमी खूप जास्त आहेत, पण त्या राज्यात चिकण-मटणपेक्षा मासे जास्त खाणे पसंत केले जाते.मांसाहार करणारी वरील ही सर्व राज्ये समुद्र किनाऱ्यापासून व नद्यांपासून जवळ आहेत. त्यामुळेच या राज्यात मांसाहार सर्वाधिक केला जातो. यानंतर राजस्थान, हरियाणा, गुजरात आणि पजांब राज्य येतात, ही राज्ये खूपच कमी मांसाहार करतात.धार्मिक कारणांमुळे या राज्यात कमी मांसाहार होतो.
हे वाचलं का?
हे ही वाचा :आयुष्यभर मोफत खाता येणार सॅंडविच, कपंनीने काय ठेवली ग्राहकांसमोर अट?
किती टक्के महिला-पुरूष मांसाहर करतात?
सर्व्हेत देशातील 10 मधून 7 नागरिक हे मांसाहार करणे पसंद करतात.एनएफएसएस-5 सर्व्हेनुसार 15 ते 49 वयोगटातील महिला-पुरूषांच्या संशोधनात 83 टक्के पुरुष आणि 70 टक्के महिला मांसाहार करणे पसद करतात.
शाकाहारी-मांसाहारी वाद काय?
मांसाहार करणारे नागरीक शाकाहारींना नेहमीच ट्रोल करतात. त्यामुळे शाकाहारी लोकांच्या तिरस्काराला व्हेजिफोबिया म्हणतात आणि शाकाहारी लोकांबद्दलच्या रागाला वेगाफोबिया म्हणतात.
ADVERTISEMENT
पोषण ट्रॅकींग अॅप असलेल्या लाईफसमने 2018 साली केलेल्या अभ्यासानूसार शाकाहारी आणि विगन डाएट करणाऱ्या 80 टक्के लोकांची खिल्ली उडवली जाते त्यांना ट्रोल केले जाते,अशी माहिती समोर आली होती. जसे त्यांना घास-फुस खाणारे म्हणून हिणवलं जातं. तसेच जितका ड्रग्स घेणाऱ्या नागीरकांचा तिरस्कार केला जातो, तितकाच तिरस्कार शाकाहारी नागरीकांचा होतो.
ADVERTISEMENT
हे ही वाचा :whatsapp scam : लाईक्स आमिष अन् ठाण्यातील व्यक्तीने गमावले 37 लाख, तुम्ही ही चूक करू नका
विक्योरिया युनिवर्सिटी ऑफ वेलिंग्टनचे रीसर्च एक्सपर्ट मार्स एस विल्सन यांनी सांगितले की, शाकाहार करणारे नागरीक मांसाहार करणाऱ्या नागरीकांमध्ये अपराधीपणाची भावना जागवायचा प्रयत्न करतात. तसेच तुमच्यामुळे मुक्या जनावरांचा बळी दिला जातोय, असे वेजिटेरीयन शाकाहांरींना सांगायचा प्रयत्न करतात. असा सल्ला देऊन शाकाहारी एकप्रकारे मांसाहारी नागरीकांवर राग व्यक्त करत असतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT