Andhra Pradesh : माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना अटक, प्रकरण काय?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Skill development case Former Andhra Pradesh CM Chandrababu Naidu has been arrested by the state Criminal Investigation Department.
Skill development case Former Andhra Pradesh CM Chandrababu Naidu has been arrested by the state Criminal Investigation Department.
social share
google news

Former CM Chandrababu Naidu arrested by Andhra Pradesh CID : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) अटक केली. भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात TDP प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी (9 सप्टेंबर) सकाळी अटक करण्यात आली. त्यांना आता नंद्याल रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून, त्यानंतर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी आपल्या दौऱ्यादरम्यान नंद्याल जिल्ह्यातील बनागनपल्ली येथे जाहीर सभेला संबोधित केले. जाहीर भाषणानंतर नायडू आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आराम करत होते. शनिवारी (9 सप्टेंबर) पहाटे 3.30 च्या सुमारास नायडू यांना अटक करण्यासाठी सीआयडीचे एपी त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेले. त्याचवेळी पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी वाहनाला घेराव घातला आणि आंध्र प्रदेश त्यांना अटक करण्यास विरोध केला.

टीडीपी कार्यकर्त्यांचा पोलिसांशी वाद

टीडीपी नेते आणि आंध्र प्रदेश सीआयडी अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यानंतर सकाळी 6 च्या सुमारास नायडू व्हॅनमधून खाली उतरले आणि त्यांनी पोलिसांशी चर्चा केली. त्यांच्या अटकेसाठी 51 CrPC अंतर्गत नोटीस जारी करण्यात आली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Maratha Reservation : तामिळनाडूत 59 टक्के आरक्षण, मग महाराष्ट्रात 50 टक्के मर्यादा का?

नायडू यांनी या प्रकरणाचा तपशील मागितला, मात्र पोलिसांनी न्यायालयासमोर तपशील सादर केल्याचे सांगत तपशील देण्यास नकार दिला. नायडू यांची चौकशी केल्यानंतर या प्रकरणाची सविस्तर माहिती आणि रिमांड अहवाल देण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. नायडू यांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे मान्य केले होते.

कोणत्या प्रकरणात अटक झाली?

कौशल्य विकास घोटाळ्यात चंद्राबाबू नायडू यांना आरोपी म्हणून पहिल्या क्रमांकांवर नाव आले आहे. यात 250 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. पोलीस अधिकार्‍यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या वकिलांना कौशल्य विकास प्रकरणात आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने जारी केलेल्या एफआयआर प्रत आणि इतर आदेशांचा तपशील दिला आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> India-Bharat : 74 वर्षांपूर्वी कसं ठरलं देशाचे नाव? आंबेडकरांची भूमिका ठरली महत्त्वाची

तथापि, चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या वकिलांनी तपास अधिकाऱ्यांना प्रथमदर्शनी पुरावे देण्याची विनंती केली, त्यांच्या नावाचा एफआयआर अहवालात उल्लेख नाही.

ADVERTISEMENT

या प्रकरणातील त्यांच्या सहभागाबाबत कोणतीही माहिती न देता त्यांना अटक कशी केली जाऊ शकते, असा सवाल माजी मुख्यमंत्र्यांनी सीआयडी अधिकाऱ्यांना केला. तथापि, पोलिसांनी सांगितले की अटक हा तपास प्रक्रियेचा प्रारंभिक टप्पा आहे.

हेही वाचा >> India, भारत, हिंदुस्तान… कुठून आली ही नावं? समजून घ्या संपूर्ण इतिहास

सर्व तपशील 24 तासांच्या आत रिमांड अहवालात प्रदान केले जातील. सीआयडी अधिकार्‍यांनी सांगितले की डीके बसू प्रकरणात घालून दिलेल्या निर्देशाप्रमाणेच ही अटक करत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT