आयुष्यभर मोफत खाता येणार सॅंडविच, कपंनीने काय ठेवली ग्राहकांसमोर अट?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

free sandwiches and drinks for lifetime subway offer for customer how to claim for know the details
free sandwiches and drinks for lifetime subway offer for customer how to claim for know the details
social share
google news

सॅंडविच खायला कोणाला आवडणार नाही, पण त्यासोबत जर कोल्ड्रिंक्स मिळाली तर मेजवाणीच.ही निव्वळ एकावेळेपूरतीचीच गोष्ट झाली. पण जर तुम्हाला रोज सॅंडविच खायला आणि कोल्ड्रिंक्स प्यायला मिळाली तर, तिही अगदी मोफत, तर तुमची दिवाळीच होईल ना. अशीच ऑफर आता सबवे (SubWay) घेऊन आला आहे. कपंनीच्या एका स्पर्धेत जर तुम्ही जिंकलात तर आयुष्यभरासाठी तुम्हाला मोफत सॅंडविच आणि कोल्ड्रिंक्स मिळणार आहेत. आता सबवे कंपनीची ही ऑफर काय आहे? आणि नेमकी स्पर्धा काय असणार आहे, हे जाणून घ्या. (free sandwiches and drink subway offer for customer how to claim for know the details)

अमेरिकेची (America) सर्वात मोठी सॅंडविच चैन कंपनी असलेल्या सबवेने ग्राहकांना आय़ुष्यभरासाठी मोफत सॅंडविच आणि कोल्ड्रिंक्स देण्याची घोषणा केली आहे.पण यामध्ये एक ट्वि्स्ट आहे. सबवेने एक नेम चेंज कॉटेस्ट ठेवला आहे.या कॉन्टेस्टनुसार जो स्पर्धक त्याचे नाव बदलून सबवे ठेवेल.त्या व्यक्तीला विजेता ठरवून मोठी रोख रक्कम देण्यात येणार आहे.

असा करता येणार स्पर्धेत अर्ज ?

दरम्यान सबवेच्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांना SubwayNameChange.com वर उद्या 1 ऑगस्टच्या सकाळी 9 वाजल्यापासून आणि 4 ऑगस्टच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत रजिस्टर करायचे आहे. ही स्पर्धो फक्त अमेरीकेतील नागरीकांसाठी असणार आहे. ज्या व्यक्तींचे वय 18 पेक्षा अधिक आहे, त्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Crime: लग्नानंतर अडीच महिन्यातच घेतला स्वत:चा जीव, कारण पत्नी…

काय बक्षीस मिळणार?

या स्पर्धेत जो व्यक्ती निवडला जाईल, त्या व्यक्तीने त्याचे नाव बदलण्याचा निर्णय़ घेतल्यास. त्या व्यक्तीला सुरूवातीला कंपनी नाव बदलण्याच्या कायदेशीर प्रक्रियेसाठी 750 डॉलर रूपये देणार आहे. यानंतर या स्पर्धेतील विजेत्याला 50,000 डॉलर म्हणजेच 41 लाख 13 हजार रूपयांचे गिफ्ट कार्ड दिले जाणार आहेत. या गिफ्ट कार्डच्या मदतीने तुम्हाला आयुष्यभर सॅंडविच आणि कोल्ड्रिंक्सचा आनंद घेता येणार आहे.

जो व्यक्ती आपले नाव सबवेत बदलण्यास इच्छूक आहे. त्या व्यक्तीला त्याचे नाव बदलण्याचे प्रमाणपत्र दाखवावा लागले. हे प्रमाणपत्र दाखवण्यासाठी त्याच्याकडे चार महिन्याचा अवधी असणार आहे. दरम्यान इच्छुकांना अधिकृत फॉर्मवर संपूर्ण नाव, ई मेल आयडी, पत्ता आणि जन्म तारीख टाकावी लागेल. जर या स्पर्धेत निवड झाल्यास नाव बदलण्यासाठी त्याला स्विकृतीही द्यावी लागते. याचाच अर्थ ज्या व्यक्तीची निवड होईल, तो त्याचे नाव सबवे ठेवेल. या सर्व प्रक्रियेनंतर त्याला फॉर्म सबमीट करावा लागेल. वेबसाईटमधून मिळालेल्या माहितीनूसार, 7 ऑगस्ट 2023 ला केवळ एका विजेत्याची निवड केली जाणार आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Jaipur Mumbai Train Firing : जवानाने चौघांवर गोळ्या का झाडल्या? ते लोक कोण?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT