Gita Press Gorakhpur : गांधी शांती पुरस्काराची रक्कम गीता प्रेसने का नाकारली, समजून घ्या वाद

मुंबई तक

ADVERTISEMENT

UPs Geeta Press Gorakhpur has been selected for the Gandhi Peace Prize for the year 2021. The Ministry of Culture has announced this.
UPs Geeta Press Gorakhpur has been selected for the Gandhi Peace Prize for the year 2021. The Ministry of Culture has announced this.
social share
google news

Gita press Gorakhpur News : वर्ष 2021 साठीच्या गांधी शांती पुरस्कारासाठी उत्तर प्रदेशातील गीता प्रेस गोरखपूरची निवड झाली आहे. सांस्कृतिक मंत्रालयाने ही घोषणा केली. या पुरस्काराबद्दल प्रेसचे विश्वस्त आणि व्यवस्थापकांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत, परंतु गीता प्रेसच्या मंडळाने पुरस्काराची रक्कम न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. गीता प्रेसला पुरस्कार देण्यावरून काँग्रेसनंही मोदी सरकारवर टीका केली आहे. नेमका वाद काय सुरू झालाय, हेच समजून घेऊ…

ADVERTISEMENT

गोरखपूर येथील गीता प्रेस परवडणाऱ्या किमतीत धार्मिक पुस्तके प्रकाशित करण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे गेल्या 100 वर्षांपासून ही संस्था हे काम करत आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली समितीने 2021 च्या गांधी शांती पुरस्कारासाठी गीता प्रेस गोरखपूरची निवड झाली आहे, परंतु कोणताही पुरस्कार न स्वीकारण्याची परंपरा गीता प्रेसने काय ठेवली आहे.

गीता प्रेसला पुरस्काराबद्दल आदर नाहीये का?

गीता प्रेस गोरखपूरच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या वेळी परंपरा मोडून पुरस्कार स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र पुरस्कारासोबत मिळणारी रक्कम घेतली जाणार नाही, असंही मंडळाने ठरवलं आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा >> Lok Sabha 2024 : शिंदे-ठाकरेंची मोर्चेबांधणी, पण हर्षवर्धन जाधवांमुळे होणार ‘करेक्ट कार्यक्रम’?

मिळालेल्या माहितीनुसार, पुरस्कारासोबत मिळणारी एक कोटी रुपयांची रक्कम गीता प्रेस स्वीकारणार नाही, असा निर्णय बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

बोर्डाच्या बैठकीत काय काय ठरलं?

आणखी सांगायचं म्हणजे, गांधी शांती पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तीपत्र, एक पट्टिका आणि उत्कृष्ट पारंपारिक हस्तकला, हातमागाचा एक तुकडा आणि एक कोटी रुपयांची रक्कम असे असेल. गीता प्रेसच्या मंडळाने जो निर्णय घेतला आहे, त्यानुसार रोख रक्कम वगळता, प्रशस्तीपत्र, फलक आणि हस्तकला, हातमाग कलाकृती स्वीकारायच्या. यामुळे भारत सरकारचा आदर आणि गीता प्रेसचा सन्मानही कायम राहील, असा विश्वास मंडळाने व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

गीता प्रेसला आहे पंतप्रधानांची प्रतीक्षा

गीता प्रेस यावर्षी आपले शताब्दी वर्ष साजरे करत आहे. शताब्दी वर्षानिमित्त या मोठ्या वारशाच्या सन्मान म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आल्याची माहिती आहे. पंतप्रधान कार्यालयाने कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले आहे, मात्र अद्याप निश्चित तारीख मिळालेली नाही, ज्याची गीता प्रेस संस्थेला प्रतीक्षा आहे.

ADVERTISEMENT

व्यवस्थापक काय म्हणतात?

गीता प्रेसचे व्यवस्थापक लाल मणि तिवारी यांनी गांधी शांती पुरस्कार 2021 साठी गीता प्रेसची निवड केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सांस्कृतिक मंत्रालय आणि भारत सरकारचे आभार मानले आहेत. गीता प्रेसच्या शताब्दी वर्षानिमित्त हा सन्मान मिळणे खूप आनंददायी असल्याचे ते म्हणाले. हेच काम आपण सातत्याने करत राहू, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

हेही वाचा >> Manisha Kayande: ‘आमदारकीसाठी मी उद्धव ठाकरेंच्या मागे लागली नव्हती, त्यांनीच…’, सगळंच सांगितलं!

काँग्रेसचा विरोध का?

गीता प्रेसला गांधी शांती पुरस्कार देण्याच्या निर्णयाला काँग्रेसने विरोध केला आहे. काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “वर्ष 2021 साठीचा गांधी शांती पुरस्कार गोरखपूरमधील गीता प्रेसला दिला जात आहे. ही संस्था शताब्दी वर्ष साजरं करत आहे. संस्थेबद्दलचे छान पुस्तक अक्षय मुकुल यांनी लिहिले 2015 मध्ये आले. त्यात यांनी संस्थेचे महात्मा गांधींसोबत असलेले तणावपूर्ण संबंध, राजकारण, धार्मिक आणि सामाजिक अजेंड्यावर सुरू असलेल्या लडढाईबद्दल लिहिलेलं आहे. त्यामुळे हा निर्णय उपहासात्मक असून, सावरकर किंवा गोडसेला पुरस्कार देण्यासारखं आहे.”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT