Google देणार OpenAI ला टक्कर! जगातील सर्वात स्मार्ट जेमिनी AI लाँच
गुगलने आपला AI टूल जेमिनी लाँच केला आहे. हा AIलार्ज लेवेंज मॉड्यूलवर काम करतो. गुगलने जूनमध्ये झालेल्या I/O डेव्हलपर्स कॉन्फरन्स इव्हेंटमध्ये या टूलबाबत माहिती दिली होती.
ADVERTISEMENT
Google Gemini AI Tool: सध्या AI ची(आर्टीफिशियल इटेलिजन्स) खूप चर्चा आहे. हा AI टूल माणसासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळेच आता OpenAI च्या चॅटजिपीटी (ChatGPT) नंतर आता गुगल आपलं AI टूल बार्ड लाँच करणार आहे. अशाप्रकारे गुगलने या क्षेत्रात उडी घेऊन एक नवीन स्पर्धाच सुरु केली आहे. गुगलचे हे AI टूल कसे असणार आहे? आणि मनुष्याचा भविष्यासाठी याचा कसा वापर होणार आहे? हे जाणून घेऊयात. (google gemini ai tool how to use google gemini ai openai chatgpt read full story)
ADVERTISEMENT
गुगलने आपला AI टूल जेमिनी लाँच केला आहे. हा AIलार्ज लेवेंज मॉड्यूलवर काम करतो. गुगलने जूनमध्ये झालेल्या I/O डेव्हलपर्स कॉन्फरन्स इव्हेंटमध्ये या टूलबाबत माहिती दिली होती. AI मॉडल्स डेवलमेंमध्ये हे मोठे पाऊल आहे. ज्याचा परिणाम गुगलच्या सर्व उत्पादनावर होईल. त्यामुळे जेमिनीचा परिणाम तुम्हाला गुगलच्या प्रोडक्टसवर दिसून येईल, असे टूल लाँच करताना गुगल डीपमाईंडचे सीईओ डेमिस हसाबीसने सांगितले आहे.
हे ही वाचा : PM Modi यांची किती आहे संपत्ती.. कशी आणि कुठून होते कमाई?
AI टूलचे तीन वेरियंट
Google Gemini ला कंपनीने तीन व्हर्जनमध्ये लाँच केले आहे. याच व्हर्जनचा सर्वात छोटा व्हर्जन नॅनो आहे, जो अॅड्रॉईड डिवाईसवर ऑफलाईनही काम करण्याची क्षमता ठेवतो. तर सर्वात चांगले व्हर्जन हे जेमिनी प्रो आहे. या व्हर्जनला तुम्ही लवकरच गुगलच्या इतर सर्विसमध्ये अनुभवू शकता. या सर्वांमध्ये सर्वात टॉपला येतो त्याचे नाव Google Gemini Ultra,हे टूल तुम्ही कल्पना करू शकत नसाल अशा सर्व एआय क्षमतेने सुसज्ज आहे. हे Google चे सर्वात शक्तिशाली AI टूल आहे, जे मानवासारख्या कामकाजाची क्षमता ठेवते. हे डेटा सेंटर आणि एंटरप्राइझ अनुप्रयोगांसाठी डिझाइन केले आहे.
हे वाचलं का?
कोणाला वापरता येणार?
गुगलने या फिचरला रिलीज करायला सुरूवात केली आहे. तुम्ही अनेक प्लॅटफॉर्मवर याचे अॅक्सेस मिळवू शकता. तर जेमिनी अल्ट्रा हे मर्यादित लोकांसाठीच उपलब्ध आहे. कारण त्याची सुरक्षा तपासणी अद्याप पूर्ण झाली नाही आहे. तसेच Gemini Proचे तुम्ही बार्ड वापरू शकता. कारण याला बार्डसोबत इंटीग्रेड केले आहे. नॅनो व्हर्जनच्या काही फीचर्सना Google Pixel 8 pro मध्ये रिलीज केले आहे.
हे ही वाचा : Sharmistha Mukherjee :”सोनिया गांधी मला पंतप्रधान करणार नाही”, गांधी कुटुंबाबद्दल गौप्यस्फोट
जेमिनीचा उपयोग काय?
Gemini एक मल्टीमॉडल टुल आहे. हे टुल फक्त माहिती देण्यापुरते मर्यादित नाही. ते मजकूर, कोड, ऑडिओ, प्रतिमा आणि व्हिडिओ समजू आणि ऑपरेट करू शकते. गुगलने याचा एक व्हिडिओ देखील जारी केला आहे.
ADVERTISEMENT
जेमिनी अल्ट्रा हे पहिले मॉडेल आहे, जे तज्ञ माणसांप्रमाणे काम करू शकते. अनेक प्रकरणात AI माणसांपेक्षा चांगली कामगिरी करते. जेमिनी AI मोठ्या प्रमाणात मल्टीटास्क भाषा समजण्यात मानवांपेक्षा चांगले कार्य करते. त्यात गणित, भौतिकशास्त्र, इतिहास, कायदा, वैद्यकीय आणि नीतिशास्त्र अशा ५७ विषयांचा समावेश आहे. एवढेच नाही तर ते कोडिंगही करू शकते, असा दाला गुगलने केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT