कुत्रा चावल्यास सरकार देणार भरपाई, प्रत्येक दाताच्या खुणेमागे मिळणार ‘इतके’ रुपये
भटक्या कुत्र्यांकडून व्यक्तीवर जर हल्ला झाला तर आता त्याची जबाबदारी सरकारला घ्यावी लागणार आहे. कारण कुत्र्याने जर हल्ला केला तर आता राज्य सरकारकडून कुत्र्याचे दात लागतील त्याप्रमाणे जखमीला नुकसान भरपाई द्यावी लागणार असल्याचे हरियाणा आणि पंजाब उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.
ADVERTISEMENT

Dog Bite: कोणत्याही व्यक्तीवर जर भटक्या कुत्र्याकडून हल्ला (Attack) करण्यात आला तर आता सरकारकडून नुकसान भरपाई मिळणार आहे. ही नुकसान भरपाई (Damages compensation) कुत्र्याच्या दाताप्रमाणे द्यावी लागणार आहे. कारण एक दात लागला असेल तर 10 हजार रुपये सरकारला मोजावे लागणार आहेत. हरियाणा आणि पंजाब उच्च न्यायालयाने (High Court of Haryana and Punjab) हा आदेश दिला आहे. एका सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे की, जर 0.2 सेमी मांस बाहेर आले असेल तर किमान 20, हजार रुपयांची भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याबाबत 193 प्रकरणांवर सुनावणी करताना न्यायालयाकडून हा आदेश देण्यात आला आहे.
संबंधित समित्यांनी कारवाई
भटके, वन्य प्राणी अचानक वाहनासमोर आल्याने जखमी किंवा मृत्यू अशा घटना आणि अपघात घडतात. त्यासाठी पीडितांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यासंदर्भातील याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यावर न्यायमूर्ती विनोद एस भारद्वाज यांच्या खंडपीठाकडून सांगण्यात आले की, कुत्रा चावल्यानंतर जर कोणी आवश्यक कागदपत्रांसह भरपाईसाठी अर्ज दाखल केला गेला, तर संबंधित समित्यांनी त्यावर कारवाई करावी असंही त्यांनी सांगितले आहे. अर्ज दाखल केल्यानंतर, सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आणि 4 महिन्यांत हे प्रकरण निकाली काढण्याचे आदेशही त्यांन यावेळी दिले आहेत.
चिंताजनक बाब
या प्रकरणी सुनावणी करताना न्यायमूर्ती भारद्वाज यांनी सांगितले की, मृतांची वाढती संख्या आणि रस्त्यांवर भटक्या प्राण्यांचे प्रमाण ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे त्याचा मानवी जीवनावर प्रचंड मोठा परिणाम होतो आहे. त्यामुळे आता राज्याने ही जबाबदारी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा >> रामदास कदमांनी घेतली शिंदेंची भेट, कीर्तिकरांबाबत मोठं विधान
प्राथमिक जबाबदारी राज्याची
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे की, ही नुकसान भरपाई देण्याची प्राथमिक जबाबदारी ही राज्याची असणार आहे. त्यामुळे राज्याकडून ही नुकसान भरपाई कुत्र्याशी संबंधित असलेल्या व्यक्ती, एजन्सी किंवा विभागाकडून ती नुकसानभरपाई वसूल करू शकते असंही त्यांनी सांगितले आहे.









