Kasba Peth Bypolls: एकनाथ शिंदेंची मध्यरात्री बैठक, कसब्यात काय होणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Kasba Peth bypolls 2023, Eknath shinde visit pune in midnight: कसबा पेठ पोटनिवडणूक चुरशीची होणार असंच चित्र सध्या दिसत आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदारसंघात भाजप-शिवसेना युती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत होताना दिसत आहे. कसब्यातील जागा राखण्यासाठी भाजपनं प्रतिष्ठा पणाला लावली असून, शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही पोटनिवडणूक गांभीर्याने घेतल्याचं दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मध्यरात्री बैठक घेतली.

ADVERTISEMENT

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पुण्यातील स्वारगेट येथील शिवसेना भवन कार्यालयास भेट दिली. त्यावेळी आमदार भरत गोगावले, प्रवक्ते नरेश म्हस्के, पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे, अजय भोसले यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना भवन कार्यालयास मध्यरात्री भेट दिली. मध्यरात्री अचानक पुणे भेटीवर मुख्यमंत्री आले. याबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या आग्रहास्तव पुणे शहर कार्यालयास भेट देण्यास आलो असून सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते हे चांगल काम करीत आहेत. तसेच पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. हा मतदारसंघ शिवसेना भाजप युतीचा बालकिल्ला आहे. या ठिकाणी आमचे उमेदवार हेमंत रासने 100 टक्के प्रचंड बहुमताने जिंकणार आहे”, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.

हे वाचलं का?

लोकसभेप्रमाणेच भाजपची विधानसभा निवडणुकीसाठी खास रणनीती! समोर आला प्लान

चिंचवड पोटनिवडणुकीबद्दल बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “चिंचवड विधानसभा मतदारसंघात कार्यक्रम झाला. त्या ठिकाणी भगवं वादळ पाहायला मिळालं. त्यामुळे शिवसेना-भाजप महायुती कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा 100 टक्के आणि प्रचंड मतांनी जिंकणार”, असा दावा त्यांनी केला.

ADVERTISEMENT

कसबा पेठ पोटनिवडणूक : मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री 2वाजता पुण्यात पोहोचले. त्यानंतर शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. मात्र, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी पिंपरी चिंचवड आणि पुण्यात दौरे केल्यानं दोन्ही मतदारसंघातील निकालाची उत्सुकता वाढली आहे.

ADVERTISEMENT

कसबा पोटनिवडणूक 2023 : पुन्हा कमळ फुलवण्यासाठी भाजपची ‘समिती’ रणनीती!

कसबा पेठ पोटनिवडणुकीत कुणाचं पारडं जड?

कसबा पेठ मतदारसंघ गेल्या काही वर्षांपासून भाजपकडं राहिला आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपनं ब्राह्मणेत्तर व्यक्तीला उमेदवारी दिली. त्यामुळे ब्राह्मण समाजातून नाराजीची प्रतिक्रिया उमटली. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत असलेले रवींद्र धंगेकर यांचं पारडं जड असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. दोन प्रभागांमध्ये धंगेकर यांचं वर्चस्व असून, ब्राह्मण समाजातील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली, तर वेगळा निकाल लागू शकतो, असं म्हटलं जात आहे. त्याचबरोबर भाजपचा उमेदवार निवडून आला, तरी कमी फरकाने विजयी होईल, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT