Mahalaxmi Racecourse: 140 वर्षांचा इतिहास अन् मुंबईची शान.. ही आहे महालक्ष्मी रेसकोर्सची खरी कहाणी…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mahalakshmi Racecourse in Mumbai is now struggling survive. Mumbai Municipal Corporation planned new plan to set up theme park
Mahalakshmi Racecourse in Mumbai is now struggling survive. Mumbai Municipal Corporation planned new plan to set up theme park
social share
google news

Mahalakshmi Race Course: मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आता त्याच्या असित्वासाठी धडपडत आहे. मुंबई महापालिकेने थीम पार्क (Theme Park) उभारण्याची तिथे नवी योजना आखली आहे. मात्र मुंबईत रेसकोर्सला एवढं प्रतिष्ठेचं स्थान का निर्माण झालं आहे आणि त्याच्याशी संबंधित नेमका वाद काय? असा अनेक जण सवाल उपस्थित केला जात आहे. मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवरील घोड्यांच्या शर्यतीची जवळपास 140 वर्षे जुनी परंपरा आता लवकरच भूतकाळात जाण्याची शक्यता आहे. कारण रेस कोर्सचे व्यवस्थापन करणाऱ्या रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (RWITC) च्या 700 सदस्यांपैकी 540 सदस्यांनी आता त्या जमिनीवर थीम पार्क बांधण्यासाठी मतदान केलं आहे.

ADVERTISEMENT

रेसकोर्सचं अस्तित्व धोक्यात

क्लबच्या जमिनीवरील 19 वर्षांच्या लीजची मुदत 2013 मध्ये संपली आहे. तेव्हापासूनच मुंबईच्या या रेसकोर्सचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. त्यातच आता बीएमसी आणि राज्य सरकारने या परिसरात थीम पार्क उभारण्याची आणि रेसकोर्स हस्तांतरित करण्याची नवी योजना आखली आहे. तर दुसरीकडे बीएमसीच्या या निर्णयाला आरडब्ल्यूआयटीसी, राजकारणी आणि कामगारांकडून तीव्र विरोधही करण्यात येत आहे.

यजमानपद महालक्ष्मी रेसकोर्सकडे

कधीकाळी ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय आणि सौदी अरेबियाच्या राजासाठी व परदेशी नेत्यांचे यजमानपद भूषवणारा महालक्ष्मी रेसकोर्स कसा अस्तित्वात आला? क्रिकेटप्रमाणेच भारतात घोड्यांच्या शर्यतीची सुरुवात इंग्रजांनी केली. त्याचा प्रारंभ 1777 मध्ये भारतातील पहिला रेस कोर्स चेन्नईमधील गिंडी येथे झाल्याची नोंद आहे.

हे वाचलं का?

भूखंड हस्तांतर

तर त्यानंतर 1802 मध्ये 4 ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बॉम्बे टर्फ क्लबची स्थापना केली आणि घोड्यांच्या शर्यतीसाठी भायखळ्याची निवड करण्यात आली. त्यानंतर बॉम्बे डाईंग टेक्सटाईल कंपनीचे प्रमुख कुसरो एन वाडिया यांनी भायखळा येथून रेस कोर्स महालक्ष्मी येथील 225 एकर भूखंडावर हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव मांण्यात आला. त्यावेळी ही जमीन सगळी पाणथळ होती. कारण वाडिया यांना अरबी समुद्राशेजारी असलेला हा भाग शोपीसमध्ये बदलायचा होता. महालक्ष्मी रेसकोर्स बांधण्यासाठी त्यांनी 60 लाख रुपयांचे कर्ज कोणत्याही व्याजाशिवाय दिले होते, त्याचे काम 1883 मध्ये पूर्ण झाले.

क्लबच्या नावात ‘रॉयल’

1935 मध्ये तत्कालीन सम्राट किंग जॉर्ज पंचम यांनी क्लबच्या नावात “रॉयल”लावण्यात मान्यता दिली. त्यानंतर त्या क्लबचे नाव रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (RWITC)असं करण्यात आले. आणि ते नाव स्वातंत्र्यानंतरही कायम ठेवण्यात आले.पहिली भारतीय डर्बी किंवा घोड्यांची शर्यत 1943 मध्ये महालक्ष्मी रेसकोर्स येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बडोद्याच्या राजाच्या मालकीच्या घोड्याने तो जिंकला होता. द हिंदूमधील एका वृत्तानुसार 1949 पर्यंत भारतीय डर्बीवर परदेशी जॉकींचे वर्चस्व होते, जेव्हा खिम सिंग हा कार्यक्रम जिंकणारा पहिला भारतीय जॉकी बनला होता.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> BMC: शिंदे-भाजपच्या आमदारांना कोट्यवधी.. ‘मविआ’च्या आमदारांचे हात रिकामेच’!

रेसकोर्सचे भवितव्य अनिश्चित

आरडब्ल्यूआयटीसीला सुरुवातीला 1934 मध्ये 30 वर्षांची लीज देण्यात आली होती. मात्र त्यानंतर 1964 मध्ये आणखी 30 वर्षांसाठी त्याचे नूतनीकरण करण्यात आले. 1994 मध्ये 19 वर्षांच्या लीजवर स्वाक्षरी करण्यात आली होती, जी 2013 मध्ये संपली होती, तेव्हापासून या रेसकोर्सचे भवितव्य अनिश्चित असल्याची चर्चा सुरू होती.

ADVERTISEMENT

खरेदीदारांना आमिषं

मुंबईत आरे वन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांसारखे काही हिरवेगार क्षेत्रं आहेत. त्यापैकीच सर्वात सुंदर म्हणजे महालक्ष्मी परिसर आहे. जो हाजी अली सारख्या वारसा आणि सांस्कृतिक ठिकाणांजवळसुद्धा आहे. सध्या निवासी मालमत्तेची मागणी सुमारे 60 हजार रुपये प्रति चौरस फूट आहे. तर बांधकाम व्यावसायिक या क्षेत्राचा रेस कोर्सच्या जवळचा उल्लेख करून संभाव्य खरेदीदारांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जातो.

काय आहे वाद?

महालक्ष्मी रेसकोर्सच्या जमिनीनुसार एक तृतीयांश जमीन बीएमसीच्या मालकीची आहे तर उर्वरित जमीन ही राज्य सरकारची आहे. 2004 पासून हा रेस कोर्स वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यानंतर RWITC पॅनेलने पेगासस इन्फ्रास्ट्रक्चर या फर्मसोबत मोठ्या भागावर गोल्फ कोर्स, हॉटेल आणि कन्व्हेन्शन सेंटर विकसित करण्यासाठी करार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

हे ही वाचा >> BJP चे माजी मंत्री जसवंत सिंहांच्या सुनेचा जागीच मृत्यू, मुलगाही जखमी.. नेमकं काय घडलं?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT