Cabinet Meeting : सरकारने अहमदनगर शहराचं नावं बदललं, आता 'या' नवीन नावाने ओळखले जाणार

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

	 maharashtra government ahmednagar name as ahilyanagar on maratha rani ahilyabai holkar cabinet meeting cm eknath shinde
अहमदनगर शहराला आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता मिळाली आहे.
social share
google news

Ahmednagar name as Ahilyanagar :राज्य सरकारने आता अहमदनगर शहराचे नाव बदलले आहे. अहमदनगर शहराला आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता मिळाली आहे. आज सह्याद्री अतिथिगृहावर झालेल्या कँबिनेट बैठकीत याबाबतचा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता अहदमनगर (Ahmednagar) शहर आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर  (Ahilyanagar) या नवीन नावाने ओळखले जाणार आहे. (maharashtra government ahmednagar name as ahilyanagar on maratha rani ahilyabai holkar cabinet meeting cm eknath shinde) 

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमडळाची बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीला उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीत अहमदनगर शहराचे नामांतर करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे आता अहमदनगर शहराचे नाव 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' असणार आहे. मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला आज मंजुरी दिली आहे.18 व्या शतकातील मराठा राणी अहिल्याबाई होळकर यांच्या नावावरून अहमदनगर शहराचे नाव 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' ठेवण्याची घोषणा मंत्रिमंडळाने केली. शहराचे नाव बदलण्याचा सरकारचा प्रस्ताव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात जाहीर केला होता. 

हे ही वाचा : Lok Sabha 2024 : भाजपच्या खासदारांची धडधड वाढली; पक्ष देणार झटका?

अहमदनगर शहराचे नाव अहमद निजामशाहच्या नावावर पडले होते. 15 व्या शतकात निजामशाहने अहमदनगरची स्थापना केली होती. तेव्हापासून अहमदनगर शहराचे नाव बदलण्यात आले नव्हते. पण आता शिंदे सरकारने अहमदनगर शहराचे नाव बदलून 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' करण्यात आले आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Lok Sabha : शरद पवारांमुळे अजित पवारांचा होणार गेम?

अहमदनगर सोबत सरकारने पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे देखील नाव बदलले आहे. सरकारने आता वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता पुण्यातील वेल्हे तालुका हा राजगड या नवीन नावाने ओळखले जाणार आहे. दरम्यान याआधी सरकारने महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर आणि धाराशीव केले होते. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT