Mumbai Weather Update: मुंबईत पुढील २४ तासात तुफान पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट
Maharashtra Weather News: आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 24 तासांत मुंबईसह कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
6 जुलैला कसं असेल मुंबईतील हवामान
मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता
अनेक जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट
Maharashtra Weather Update: मुंबई: मान्सूनच्या सक्रियतेमुळे महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. गेल्या 24 तासांत मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला असून शनिवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. (maharashtra mumbai weather news meteorological department weather forecast for next 24 hours 6th july 2024 yellow alert issued in many districts)
ADVERTISEMENT
महाराष्ट्र हवामान अपडेट (Maharashtra Weather Alert)
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) वरिष्ठ शास्त्रज्ञ सुनील कांबळे यांनी सांगितले की, 'मुंबईत आज मुसळधार पाऊस पडू शकतो. आम्ही मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईत २ ते ३ दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे.'
हे ही वाचा>>
त्याचबरोबर विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस मराठवाड्यातील विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हे वाचलं का?
7 जुलै ते 11 जुलै या कालावधीत मुंबई, ठाणे आणि उपनगरात चांगला पाऊस पडेल, असे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. त्याच वेळी, काही हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शनिवारी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल, त्यामुळे पुढील आठवड्यात मुंबईत जोरदार पाऊस पडू शकतो. ही हवामान प्रणाली मजबूत राहिल्यास पुढील आठवड्यात मुंबईत 2-3 दिवसांत सुमारे 200 मिमी पाऊस पडू शकतो.
हे ही वाचा>>
विशेष म्हणजे जुलैमध्ये देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. IMD ने ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ईशान्य भारतातील अनेक भाग आणि वायव्य, पूर्व आणि आग्नेय द्वीपकल्पीय भारतातील काही भाग वगळता देशातील बहुतांश भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT