मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची कुणबी नोंद सापडली, प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा
मनोज जरांगे पाटील यांची कुणबी असल्याची नोंद बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तहसील कार्यालयामध्ये आढळली असल्याचे मोडी लिपी संशोधन करणाऱ्या पथकाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबातील व्यक्ती देखील कुणबी असल्याचा पुरावा सापडला आहे.
ADVERTISEMENT
Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटलांचे आंदोलन सुरु आहे. अंतरावाली सराटीमधून आंदोलन करून राज्य सरकारला घाम फोडणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण (Maratha Reservation) देण्याची मागणी केली, त्यानंतर अनेक प्रश्नही निर्माण झाले होते. कुणबी मराठा नोंदी मिळवण्यासाठी सरकारी समितीने काम सुरु केले मात्र ज्या जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरु केले होते. त्यांच्याच कुटुंबामध्ये कुणबी नोंद सापडली नसल्याने त्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. कुणबी नोंद सापडली नसल्यामुळे जरांगे पाटलांना आरक्षण मिळणार नसल्याची चर्चा सुरु असतानाच आता शिरुरच्या तहसील कार्यालयामध्ये मोडी लिपीमध्ये ही नोंद आढळल्याचे सांगण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
जरांगेंचे कुटुंबीय ‘कुणबी’
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी जोरदार आंदोलन केले होते. मात्र सुरुवातीच्या काळात जरांगे पाटलांच्या कुटुंबीयांची नोंद सापडली नसल्यामुळे अनेक सवाल उपस्थित झाले होते. मात्र आज मोडी लिपी संशोधन करणाऱ्या संशोधन पथक शिरूर दौऱ्यावर असताना त्यांना जरांगे पाटील यांच्या कुटुंबातील व्यक्ती कुणबी असल्याचा पुरावा त्यांना मिळाला आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटलांचा मार्ग मोकळा झाल्याचे मत व्यक्त होत आहे.
हे ही वाचा >> Sharad Mohol : घरात जेवले, अंगणात काढला काटा… रक्षक बनून घेतला बदला
संशोधन पथकाकडून स्पष्ट
ओबीसीमधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचीदेखील नोंद सापडली आहे. शिरूर तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये मोडी लिपीमध्ये ही नोंद आढळून आल्याचे मोडी लिपी संशोधन करणाऱ्या पथकाने सांगितले. संशोधन पथकाकडून जरांगे पाटलांच्या कुटुंबीयांचे नोंदी आढळल्याचे सांगण्यात आले.
हे वाचलं का?
मार्ग मोकळा
मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबातील व्यक्तींचादेखील कुणबी असल्याचा पुरावा आढळून आल्याने आता जरांगे पाटील यांना आता कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. ही नोंद सापडली तेव्हा त्यांचे वडीलदेखील आज शिरूर तहसील कार्यालयामध्ये हजर होते.
हे ही वाचा >> ‘बाप हा बाप असतो…’, आव्हाडांनी अजित पवारांना ठणकावून सांगितले
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT