Railway अधिकाऱ्याच्या घरी सापडले नोटांचे ‘एवढे’ बंडल, सीबीआयलाही बसला धक्का!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

railway officer kc joshi arrested in bribery case when cbi reached the house found bundles of rs 2 crore notes were
railway officer kc joshi arrested in bribery case when cbi reached the house found bundles of rs 2 crore notes were
social share
google news

Railway Officer KC Joshi Bribe: लखनऊ: केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने (CBI) भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केलेल्या एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल 2.61 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. के. सी. जोशी असे या रेल्वे अधिकाऱ्याचे नाव असून तो गोरखपूर येथे तैनात होता. (railway officer kc joshi arrested in bribery case when cbi reached the house found bundles of rs 2 crore notes were)

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, ईशान्य रेल्वे गोरखपूरचे प्रधान मुख्य सामग्री अधिकारी के.सी. जोशी यांना मंगळवारी (13 सप्टेंबर) सायंकाळी एका कंत्राटदाराकडून तीन लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली.

नेमकं प्रकरण काय?

कंत्राटदाराने सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) कडे तक्रार केली होती की त्याची कंपनी ईशान्य रेल्वे (एनईआर) ला उत्पादने आणि सेवा पुरवते आणि त्याला तीन ट्रक पुरवठा करण्याचे कंत्राट करारानुसार मिळाले होते, ज्यासाठी त्याला रु. दरमहा 80,000 रुपये मिळणार होते.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> Nashik Murder : सुखी संसाराची क्षणात झाली राखरांगोळी, आधी संपवलं पत्नीला नंतर…

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याने (कंत्राटदाराने) आरोप केला की केसी जोशी यांनी सरकारी ई-मार्केटप्लेस (GeM) वेबसाइटवरून आपल्या फर्मची नोंदणी रद्द करण्याची आणि करार संपुष्टात आणण्याची धमकी देऊन तब्बल 7 लाख रुपयांची लाच मागितली होती. केंद्रीय अन्वेषण विभागाने या आरोपाची पडताळणी करून केसी जोशींना रंगेहाथ पकडण्यासाठी एक सापळा रचला.

याबाबत सीबीआयचे अधिकारी म्हणाले की, ‘या प्रक्रियेत जोशी यांना पकडण्यात आले, त्यानंतर गोरखपूर आणि नोएडा येथील त्यांच्या घर आणि संबंधित ठिकाणी छापेमारी करण्यात आली, जिथे सीबीआयला तब्बल 2.61 कोटी रुपयांची रक्कम रोख सापडली. जी तात्काळ जप्त करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Sangli News : पोहत पोहत मगरीजवळ गेला, अन् लोकांच्या काळजाचा ठोका चुकला

सीबीआयने सापळा रचून तक्रारदाराकडून 3 लाख रुपयांची लाच घेताना आरोपी केसी जोशीला याला रंगेहाथ पकडले. गोरखपूर आणि नोएडा (उत्तर प्रदेश) येथे आरोपींच्या अधिकृत आणि निवासी जागेची झडती घेण्यात आली. जिथे सीबीआयला रु. 2.61 कोटी (अंदाजे) आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपी केसी जोशीला लखनऊ येथील न्यायालयात हजर करण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT