Samruddhi Mahamarg Accident News : वनकर कुटुंब उद्ध्वस्त! मायलेकी अन् सासू..
समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातील ट्रॅव्हल्समध्ये पिंपळे सौदागर येथे राहात असलेल्या वनकर कुटुंबातील दोन महिला आणि एका चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. प्रणित वनकर हे संगणक अभियंते असून त्यांची आई, दोन वर्षीय मुलगी आणि पत्नी या नागपूर येथे लग्न समारंभासाठी गेल्या होत्या.
ADVERTISEMENT
Pune : महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात शुक्रवारी (5 जून) रात्री उशिरा एक मोठा अपघात झाला. बुलढाणा येथील सिंदखेड येथील राजा शहराजवळ समृद्धी महामार्ग द्रुतगती मार्गावर नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या बसचा हा अपघात झाला. अपघातानंतर सिटी लिंक ट्रॅव्हल्स बसला भीषण आग लागली. बस पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. (Samruddhi Mahamarg accident news in Vankar family Mother In Law, daughter in law and grand Daughter Died)
ADVERTISEMENT
Maharashtra Politics : भूकंप होणार! अजित पवार, फडणवीस आणि शिंदे राजभवनात
अपघातात पिंपरी चिंचवडमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातील ट्रॅव्हल्समध्ये पिंपळे सौदागर येथे राहात असलेल्या वनकर कुटुंबातील दोन महिला आणि एका चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. प्रणित वनकर हे संगणक अभियंते असून त्यांची आई, दोन वर्षीय मुलगी आणि पत्नी या नागपूर येथे लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. प्रणित वनकर देखील गेले होते. परंतु, ते गेल्या आठवड्यातच पुण्यात परत आले आणि आई, मुलगी आणि पत्नी ट्रॅव्हल्सने येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. या घटनेमुळे पिंपरी- चिंचवड शहरात शोककळा पसरली आहे. याबाबतची माहिती स्थानिक माजी नगरसेवक नाना काटे यांनी दिली आहे.
Samruddhi Accident : ‘4-5 प्रवाशी अंगावर पडले अन्…’, साईनाथने सांगितला घटनाक्रम
चिमुकलीच्या येण्याने वनकर कुटुंबाला मिळालेला आधार क्षणातच उद्ध्वस्त
दोन वर्षांच्या ओव्हीमुळे वनकर कुटुंबाला जगण्याचं नवं आशेचं किरण मिळालं होतं. दत्तक घेतलेल्या ओव्हीमुळे वनकर कुटुंब आनंदात होतं. दोन वर्षांच्या ओव्हीला वृषाली आणि प्रणितने काही महिन्यांपूर्वी दत्तक घेतले होते. ओवीच्या येण्याने कुटुंबात आनंदी वातावरण होतं. वृषालीचा परिवार सुखी संसाराचं स्वप्न बघत असतांना इवलेसे बाळ आजीच्या खांद्यावर, मांडीवर बागडायला लागलं होतं. लग्नसमारंभासाठी हा परिवार पुण्याहून वर्ध्यात आला होता. पुण्याला परतत असताना काळाचा घाला वनकर कुटुंबावर झाला. सासू-सुनेसह चिमुरडी आगीच्या कचाट्यात आल्याने सारं काही क्षणातच उद्ध्वस्त झालं.
हे वाचलं का?
Samruddhi Accident : 24 चिंता पेटताच आक्रोश! उपस्थितांच्या काळजाचं झालं पाणी!
मृतांमध्ये प्रणित वनकर यांची आई शोभा वनकर (वय ६०), पत्नी वृषाली वनकर (वय ३८) आणि मुलगी ओवी (वय २ वर्षे) यांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT