सातारा : जेवणानंतर घेतला आयुर्वेदिक काढा अन् बाप-लेकाचा गेला जीव
हणमंतराव पोतेकर व त्यांचा एकुलता एक मुलगा अमित पोतेकर (वय 32 ) यांनी रात्री कुटुंबासमवेत जेवण केले. जेवण आटोपल्यानंतर त्यांनी आयुर्वेदिक काढा घेतला.
ADVERTISEMENT

सातारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पितापुत्राचा मृत्यूमुळे फटलणमध्ये खळबळ उडाली आहे. काढा घेतल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
हणमंतराव पोतेकर व अमित पोतेकर अशी मृत्यू झालेल्या पितापुत्राची नावे आहेत. अचानक मध्यरात्रीच्या सुमारास हणमंतराव व त्यांचा मुलगा अमित, मुलगी या तिघांना त्रास जाणवू लागला. रात्रीत तिघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पितापुत्राचा मृत्यू झाला.
हणमंतराव रामभाऊ पोतेकर (वय 55) हे त्यांच्या कुटुंबासोबत फलटण शहरातील गजानन चौक येथे वास्तव्यास आहेत. दरम्यान, हणमंतराव पोतेकर व त्यांचा एकुलता एक मुलगा अमित पोतेकर (वय 32 ) यांनी रात्री कुटुंबासमवेत जेवण केले. जेवण आटोपल्यानंतर त्यांनी आयुर्वेदिक काढा घेतला.
वाचा >> आईला शेजाऱ्यासोबत पाहिलं नग्नावस्थेत, अन् मुलासोबत घडली थरकाप उडवणारी घटना
काढा पिल्यानंतर ते झोपी गेले. पण, मध्यरात्रीच्या सुमारास हणमंतराव व त्यांचा मुलगा अमित, मुलगी अशा तिघांना त्रास होऊ लागला. त्यांना रात्रीच शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.










