'जरा जरी चूक झाली तर सगळंच संपेल...' असं का म्हणालेला शिल्पकार जयदीप आपटे, नेमका आहे तरी कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

जयदीप आपटे नेमका आहे तरी कोण?
जयदीप आपटे नेमका आहे तरी कोण?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला

point

शिवाजी महाराजांचा पुतळा बनवलेला शिल्पकार जयदीप आपटे याने

point

जाणून घ्या कोण आहे जयदीप आपटे

Who is jaideep apte: मुंबई: सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आज (26 ऑगस्ट) सकाळच्या सुमारास अचानक कोसळला. ज्यानंतर हा पुतळा नेमका कोणी तयार केला होता तो उभारणारा मूर्तीकार कोण? याविषयी अनेक प्रश्न विचारले जात आहेत. याचबाबत आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (statue of shivaji maharaj sindhudurga why did sculptor jaideep apte say that even if there is a mistake everything will end who is exactly)

ADVERTISEMENT

राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा हा नौदल दिनानिमित्त उभारण्यात आला होता. जो नौदलाच्या वतीने उभारण्यात आला होता. या पुतळ्याचं कंत्राट हे मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंपनीला  काम देण्यात आले होते. ज्याचे प्रोप्रायटर आणि शिल्पकार हे जयदीप आपटे आहेत तर चेतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते.

हे ही वाचा>> Chahatrapati Shivaji Maharaj: शिंदे सरकार की Navy... शिवाजी महाराजांचा पुतळा कोणी उभारलेला? 'ते' पत्र समोर आलं अन्...

दरम्यान, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे याच्याविषयी सध्या बरीच चर्चा सुरू आहे.

हे वाचलं का?

4 डिसेंबर 2023 रोजी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण झाल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे याची एक विशेष मुलाखत सनातन प्रभात या दैनिकात छापून आली होती. ज्यामध्ये त्याने पुतळा उभारणीविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

कोण आहे जयदीप आपटे?

जयदीप आपटे हा अवघे 25 वर्षे वयाचा तरूण शिल्पकार आहे. जो मूळच्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील रहिवासी आहे. याच जयदीप आपटे याच्यावर मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 28 फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा बनविण्याची जबाबदारी ही नौदलाकडून सोपविण्यात आली होती.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Chhatrapati Shivaji Maharaj: 'तेव्हाच PM मोदींना सांगितलेलं, महाराजांचा पुतळा...', संभाजीराजेंचं कोणी नव्हतं ऐकलं?

सनातन प्रभात या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत जयदीप आपटे याने स्वत:च असं म्हटलं आहे की, 28 फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा बनविण्यास 3 वर्षांचा काळ लागतो. पण हा पुतळा जून 2023 मध्ये बनविण्यास सुरुवात केली आणि तो डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण झाला.

ADVERTISEMENT

'त्या' मुलाखतीत जयदीप आपटे नेमकं काय म्हणालेला?

या मुलाखतीत जयदीप आपटे म्हणतो की, 'या पुतळ्याच्या कामासंबंधी पहिल्यांदा जेव्हा कळलं तेव्हा पहिल्यांदा मनात विचार येऊन गेला. संधी मोटी आहे, सगळं व्यवस्थित पार पडले तर सगळीकडे नाव होईल, पण जरा जरी चूक झाली तर सगळंच संपेल, असे वाटले.. पण म्हटलं काय व्हायचं ते होऊ दे.. संधी हातातून सोडायची नाही.'

'कदाचित हे काम होणार होते म्हणूनच कि काय, या कामाच्या आधी ३ - ४ शिल्पे बनवण्याची संधी मिळाली होती. ती अगदी दीड दोन फुटांची होती; पण ती करतांना अभ्यास होत होता. जून महिन्याच्या मध्यात पहिल्यांदा या कामासंबंधी मला विचारणा झाली ती 'एखादा पुतळा तयार करणार का?', अशी. भारतीय नौदल काम करून घेणार.'

'त्यात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात पुतळा बसणार; म्हणून मग मीच ठरवले की, काम करायचे. एका आठवड्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे ३ लहान नमुने (मॉडेल) बनवले. त्यातील २ नौदल अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार बनवले आणि तिसरा नमुना अक्षरशः अचानक घडलेले शिल्प होते आणि नेमके तेच शिल्प निवडले गेले.

काम चालू केल्यावर आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेली मात!

काम चालू केले, तेव्हा नक्की होते की, '३ डायमेन्शनल प्रिंटिंगचा आधार घेऊनच हे काम पूर्ण करायचे, किंबहुना तरच हे काम इतक्या अल्प वेळात पूर्ण होईल. तसे चालू केले; पण काही गणिते चुकली आणि ठरलेल्या वेळेत काम होणार नाही, असे लक्षात आले. तेव्हा अचानक पूर्ण मॉडेल ३ डायमेन्शनल प्रिंट करायचे, असे ठरवले. ‘३ डायमेन्शनल प्रिंटिंग'चा व्यवसाय असलेले माझे मित्र आहेत. त्यांनी अक्षरशः एका रात्रीत १८ नवीन प्रिंटर उभे केले आणि प्रिंटिंगचे काम चालू झाले महत्त्वाचा टप्पा होता तो 'कास्टिंग' झालेले तुकडे एकत्र जोडणे. 

खरेतर पूर्ण पुतळा स्टुडिओमध्ये जोडून मग जागेवर नेला जातो; पण पुतळा बसवायच्या जागेपर्यंतचे रस्ते लहान आणि हातातला वेळ अल्प ही दोन्ही गणिते बघता पुतळा जागेवर जोडायचा ठरवले. २७ ऑक्टोबरपासून जागेवर जोडकामाला प्रारंभ झाला. त्यात प्रत्येक दिवसाला नवीन अडचणी उभ्या रहात होत्या. अगदी जागेवर विषारी साप निघण्यापासून, कधी पाऊस, कधी आपसांत वाद, कधी विजेचा खेळखंडोबा, एक ना दोन! 

या वेळी केवळ एकच विचार होता, 'ज्यांचे शिल्प बनवतो आहे, त्यांनी (छत्रपती शिवरायांनी) आयुष्यभर किती अवघड प्रसंगांना धिराने तोंड दिले आहे, तर मग आपण त्या तुलनेत काहीच सहन करत नाही.' या विचाराने ऊर्जा मिळायची आणि केवळ त्यामुळे काम पूर्ण करू शकलो.

काही योगायोग!

काही गोष्टी नियतीने ठरवल्यासारख्या घडून आल्या होत्या. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची मुहूर्तमेढ रोवली, त्या दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरात हा पुतळा केला गेला. ज्या आरमाराचा प्रारंभ राजांनी केला, त्याच भारतीय नौदलाने हे काम दिले आणि कामाची सांगता झाली, ती मराठा आरमाराची सागरी राजधानी असणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात !

कुटुंबीय, मित्र आणि नौदल अधिकारी यांचे मिळालेले साहाय्य!

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळी महाराज आग्र्याला अडकले होते, तेव्हा किल्ल्याचे बांधकाम करणाऱ्यांनी स्वतःचे घर, दागिने गहाण ठेवून काम पूर्ण केले होते. त्याचप्रमाणे प्रारंभी माझे कुटुंबीय, माझे मित्र यांनी पुष्कळ साहाय्य केले. काम शेवटच्या टप्प्यात असतांना नौदलाच्या अधिकाऱ्यांनी पुष्कळ साहाय्य केले. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT