वाढदिवस साजरा करायला आल्या अन् नदीत बुडून सख्ख्या बहिणींचा मृत्यू
पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील कळंब जवळील एकलहरे हद्दीतील नदीपात्रात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. प्रीती शाम खंडागळे (वय 17) आणि आरती श्याम खंडागळे ( वय 18) अशी या मृत तरूणींची नावे आहेत. कपडे धुण्यासाठी या तरूणी नदीपात्रात आल्या होत्या.
ADVERTISEMENT
Two sister drowned in river pune : पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील कळंब जवळील एकलहरे हद्दीतील नदीपात्रात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. प्रीती शाम खंडागळे (वय 17) आणि आरती श्याम खंडागळे ( वय 18) अशी या मृत तरूणींची नावे आहेत. कपडे धुण्यासाठी या तरूणी नदीपात्रात आल्या होत्या. यावेळी पाय घसरून एक तरूणी पडली होती, तर तिला वाचवण्यसाठी दुसऱ्या तरूणीने उडी घेतली होती. दोघांनाही पोहता येत नसल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने गावावर आणि खंडागळे कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. (two sister drowned in river pune ambegaon crime story)
ADVERTISEMENT
मृत तरुणी आपल्या मावशीच्या घरी मावस भावाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुंबई येथून आल्या होत्या. या दोघी मावशी कुशा घोरपडे,मावस बहीण वर्षा घोरपडे व कावेरी आलझेंडे यांच्या सोबत घोड नदीवर कपडे धुत होत्या. यावेळी कावेरीचा पाय घसरला होता आणि पाण्यात ती पडली होती. तिला वाचवण्यासाठी प्रीती खंडागळे व आरती खंडागळे या दोघींनी नदीत उडी मारली. मात्र दोन्ही तरूणींना (Two sister) पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत झाल्याची घटना घडली आहे. आज दुपारी 12 वाजता ही घटना घडली आहे.
हे ही वाचा : ‘ते’ हसणं साक्षीसाठी ठरलं जीवघेणं; साहिलने का केला होता तिघांच्या हत्येचा प्लान?
एकलहरे येथील रहिवासी असलेल्या प्रियंका डोके यांना नदीपात्राजवळ महिलांचा आरडाओरडा ऐकू येत होता. त्यावेळेस त्यांनी ही घटना पती राहुल डोके यांना फोन करून सांगितली. एकलहरे गावचे माजी उपसरपंच दीपक डोके, क्लार्क राहुल डोके, पोलीस पाटील निखिल गाडे, अक्षय धोत्रे, राम फलके, माजी सरपंच संतोष डोके यांना ही घटना कळताच नदीपात्रात उड्या मारून सदर मुलींचा शोध घेतला गेला.मात्र घटनेला बराच वेळ उलटल्यामुळे त्या मृत्युमुखी पडल्या आहेत.
हे वाचलं का?
दरम्यान मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सुदाम घोडे तसेच मंचर पोलीस स्टेशनचे ट्राफिक पोलीस कर्मचारी सोमनाथ गवारी,धनेश मांदळे, गणेश येळवंडे,अभिषेक कवडे घटनास्थळी दाखल होऊन पाहणी करून सदर घटनेचा पंचनामा केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
हे ही वाचा : बिहार ते महाराष्ट्र, 59 मुलांची तस्करी, पोलिसांना हाणून पाडला तस्करीचा डाव
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT