Mumbai Local : बापरे! पश्चिम रेल्वेवर तब्बल 10 तासांचा ब्लॉक, कसं असणार वेळापत्रक
Mumbai Local : पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते कांदिवली या स्थानाकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी 35 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत पाच महत्त्वाचे 10 तासांचे ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पश्चिम रेल्वेवर तब्बल 10 तासांचा ब्लॉक
शनिवार आणि रविवार ब्लॉक असणार
गोरेगाव-कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम
Mumbai local news : लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वेवर आज शनिवारी (ता. 31 ऑगस्ट) आणि रविवारी (ता. 1 सप्टेंबर) या दोन दिवशी 10 तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. गोरेगाव-कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू असल्याने दोन दिवस हा हा ब्लॉक घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या ब्लॉक कालावधी नेमकं वेळापत्रक कसं असणार आहे? हे जाणून घेऊयात. (western raiway 10 hours megablock goregaon kandivali station six line work mumbai local)
ADVERTISEMENT
पश्चिम रेल्वेवर शनिवारी (ता. 31 ऑगस्ट) रात्री 10 ते रविवारी (ता. 1 सप्टेंबर) सकाळी 8 दरम्यान गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर 10 तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत सर्व अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल बोरिवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच, चर्चगेट आणि बोरिवली धीम्या लोकल गोरेगाव स्थानकांवरून अंशतः करून पूर्ववत करण्यात येणार आहेत.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : महिलांनो, खाते तपासायला सुरू करा...आजच 3000 जमा होणार?
या ब्लॉक कालावधीमध्ये अप आणि डाऊन मेल आणि एक्सप्रेस गाड्या अंदाजे 10 ते 20 मिनिटे विलंबाने धावणार आहेत. तर ब्लॉकदरम्यान काही लोकल रद्द आणि काही अंशतः रद्द करण्यात येणार आहेत.
हे वाचलं का?
35 दिवसांचा मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते कांदिवली या स्थानाकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी 35 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत पाच महत्त्वाचे 10 तासांचे ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीमध्ये सुमारे 100 ते 140 लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. तर, 40 लोकल सेवा अंशत: रद्द करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मध्य रेल्वेवर ब्लॉक
मध्य रेल्वेवरील माटुंगा – मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या लोकलना शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर पुन्हा त्या डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येईल.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Beef Carrying Man Assaulted : 'गोमांस आणतो काय...' मांस पाहून वृद्धाला ट्रेनमध्येच भीषण मारहाण; Video व्हायरल
हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वेच्या कुर्ला – वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – पनवेल / बेलापूर / वाशीला जाणाऱ्या अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी या दरम्यान विशेष लोकल धावतील.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT