BBC इंडियावर मोठी कारवाई : ईडीने फास आवळला, गुन्हा दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Central investigative agency ED has registered a case under the Foreign Exchange Management Act against BBC India.
Central investigative agency ED has registered a case under the Foreign Exchange Management Act against BBC India.
social share
google news

ED | BBC : 

ADVERTISEMENT

केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने BBC इंडियाच्या विरोधात विदेशी चलन व्यवस्थापन कायद्यांतर्गत (FEMA) गुन्हा दाखल केला आहे. भारतात बीबीसीवर अशी कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये आयकर विभागाने दिल्ली आणि मुंबईतील बीबीसी कार्यालयावर छापा टाकला होता. तसंच काही कागदपत्रांचीही तपासणी केली होती. (Central investigative agency ED has registered a case under the Foreign Exchange Management Act against BBC India.)

या प्रकरणी अधिकृत निवेदन देताना, आयकर विभागाने म्हटले होते की ते कंपनीकडून थेट परकीय गुंतवणुकीच्या उल्लंघन प्रकरणात बीबीसीची चौकशी करतील. त्यानंतर या संदर्भात, आज ईडीने बीबीसीवर परकीय चलन उल्लंघन कायदा (फेमा फंडिंग अनियमितता) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

हे वाचलं का?

बीबीसीवर फेब्रुवारीमधील कारवाईबद्दल आयकर विभागाने माहिती दिली होती. बीबीसीने जाणीवपूर्वक ट्रान्सफर प्राइसिंग नियमांचे पालन केलं नाही, तसेच नफ्यातील रक्कम वळवल्यामुळे हे सर्वेक्षण करण्यात आलं, असं आयटी विभागानं म्हटलं आहे. बीबीसीच्या बाबतीत या नियमांचं पालन गेल्या काही वर्षांपासून होत नाही. त्यासाठी त्यांना काही नोटीशी देखील दिल्या होत्या. करासह अन्य फायद्यासाठी किंमतीमध्ये फेरफार करण्यात आले. नियमांचं उल्लंघन करण्यात आलं, असे आरोप आयकर विभागाने केले आहेत. त्यामुळे हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे.

आयकर विभागाने तीन आरोप केले आहेत :

  • ट्रान्सफर प्रायसिंग नियमांचे पालन केले नाही.
  • ट्रान्सफर प्रायसिंग नियमांचे सतत आणि जाणीवपूर्वक उल्लंघन.
  • नफ्याची रक्कम जाणीवपूर्वक वळवणे.

डॉक्युमेंटरीमुळे बीबीसीवर कारवाई?

बीबीसीने काही दिवसांपूर्वीच एक डॉक्यूमेंट्री रिलीज केली होती. ही डॉक्यूमेंट्री 2002 च्या गुजरात दंगलीवर आधारित होती. केंद्र सरकारने या डॉक्यूमेंट्रीला अपप्रचार असल्याचे सांगत त्याच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत आयकर विभागाने बीबीसीवर कारवाई केल्याने बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीशी संबंध जोडून विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT