Atul Subhash Case : अनैसर्गिक संबंध ते पैशांची मागणी; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी अतुल सुभाषचे आरोप
बेंगळुरूमधील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या 34 वर्षीय AI इंजिनिअर अतुल सुभाष यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. ते मूळ उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. त्यांनी 24 पानांची सुसाईड नोट आणि 90 मिनिटांचा व्हिडीओ करत आपल्या या निर्णयामागचं कारण सांगितलं आहे,
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अतुल सुभाष यांनी धक्कादायक व्हिडीओमध्ये काय म्हटलं?
अतुल सुभाष यांचं प्रकरण नेमकं काय?
Atul Subha Case Details : कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये आयटी क्षेत्रातील कर्मचारी अतुल सुभाष यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाने देशात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे देशातील हुंड्याच्या प्रकरणांमधील शोषण आणि न्यायालयीन कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. उत्तर प्रदेशच्या जौनपूर येथील रहिवासी आणि मृत अतुल सुभाष यांची पत्नी निकिता सिंघानिया यांनी अतुल सुभाष आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध एकूण 9 गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, यातील अनेक खटले पत्नीने 'आपल्याला माहिती नसल्याचं सांगून' मागे घेतले, तर काही वेळा वकिलाने आपल्या संमतीशिवाय खटले दाखल केलेत असं म्हणत काही केस मागे घेतल्या.
बेंगळुरूमधील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या ३४ वर्षीय एआय इंजिनिअर अतुल सुभाष यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. ते मूळ उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. त्यांनी 24 पानांची सुसाईड नोट आणि 90 मिनिटांचा व्हिडीओ करत आपल्या या निर्णयामागचं कारण सांगितलं आहे, यामध्ये अतुल सुभाषने यांनी आपली पत्नी आणि पत्नीच्या कुटुंबावर आपला छळ केल्याचे गंभीर आरोप केले आहेत.
हे ही वाचा >>Manoj Jarange Beed : "तुमच्या आज्याची, बापांची चालत होती, पण आता...", सरपंचाच्या हत्येनंतर जरांगेंचा कुणाला इशारा?
अतुल सुभाष यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे की, "मी पैसे देण्यास नकार दिला आणि मी हा निर्णय घेतो आहे. कारण मला माझ्याच पैशांचा वापर त्यांनी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर अत्याचार करण्यासाठी व्हावा असं मला वाटत नाही. न्यायालयाबाहेरच्या गटारात माझी राख टाकून द्या." असं म्हणत अतुल सुभाष यांनी टोकाचा निर्णय घेतला.
अतुल सुभाष यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या पत्नीने त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल केले आहेत, तसंच पत्नी आता आपल्याला तब्बल 3 कोटींची मागणी करत आहे. अतुल सुभाष हे बेंगळुरू शहरातील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मध्ये DGM म्हणून कार्यरत होते.










