'तो काळा आहे, शारीरिक संबंधातून मला संतुष्ट..' एका महिन्यातच बायकोने नवऱ्याला सोडून दिलं
Viral News : विवाहित महिलेनं एक महिन्यातच आपल्या पतीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. महिलेनं पतीपासून दूर जाण्याचे कारण सांगितलं. आपला पती काळा आहे आणि ती त्याच्यासोबत शरीसंबंधांवर समाधानी नाही. दोघांमध्ये सुरु असलेला वाद सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले, परंतु त्याचा काहीही एक परिणाम झाला नाही.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्नी नवऱ्याच्या शारीरिक संबंधावरून संतुष्ट नव्हती
प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय
Viral News : उत्तर प्रदेशातील हथरसमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विवाहित महिलेनं एक महिन्यातच आपल्या पतीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. महिलेनं पतीपासून दूर जाण्याचे कारण सांगितलं. आपला पती काळा आहे आणि ती त्याच्यासोबत शरीसंबंधांवर समाधानी नाही. दोघांमध्ये सुरु असलेला वाद सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले, परंतु अभिषेकची पत्नी ठाम राहिली. हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.
हे ही वाचा : 'आयुष्यभर तुमच्यासोबत..', विदीप जाधवांच्या पत्नीचं सांत्वन करताना सुनेत्रा पवार काय म्हणाल्या? VIDEO
पत्नी नवऱ्याच्या शारीरिक संबंधावरून संतुष्ट नव्हती
हथरस येथील रहिवासी असलेल्या अभिषेकनं महिनाभरापूर्वी हथरस येथील एका महिलेशी विवाह केला होता. त्यांचा सुखाचा संसार सुरु होता, पण अचानकपणे त्याची पत्नी त्याच्या शारीरिक संबंधावरून संतुष्ट नव्हती. अभिषेकला याबाबत समजताच त्याला मोठा धक्का बसला. त्याने आपल्या पत्नीला समजवण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण नंतर तिने नकार दिला.
'काही गोष्टी मी उघडपणे बोलू शकत नाहीत'
ती म्हणाली की, माझ्या लग्नाला महिला झाला, माझा नवरा एका खासगी कंपनीत काम करतो. आमच्यात कोणतीही कौटुंबिक समस्या नाही. शारीरिक संबंधांशी संबंधित काही समस्या आहेत. काही गोष्टी मी उघडपणे बोलू शकत नाहीत. मला आता त्याच्यासोबत राहायचे नाही आणि मी हे प्रकरण पोलीस ठाण्यात जाऊन सोडवण्याचा प्रयत्न करू इच्छित आहे.
या प्रकरणी महिलेचा पती अभिषेक सक्सेना नंतर खूप निराश झाला, या परिस्थितीत तो म्हणतो की लग्न दोन्ही कुटुंबाच्या संमतीने झाले होते, परंतु आता त्याची पत्नी त्याच्या काळ्या रंगामुळे चिडली. भावनिकपणे, म्हणाला की, लग्नावर सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचा खर्च झाले. आता फक्त तिला मी आवडत नसल्याने हे नातं तुटलं, मला दुःख होतंय. कुटुंबाने अभिषेक आणि त्याच्या पत्नीमधील सुरू असलेला वाद सोडवण्याचा खूप प्रयत्न केला.










