सोलापूर हादरलं! 14 वर्षीय मुलीसह आईने रेल्वेखाली उडी मारत संपवलं जीवन

मुंबई तक

Solapur news : सोलापूर शहरात मन हेलावून टाकणारा प्रकार उघडकीस आलाय. रविवारी पहाटे सुशीलनगर परिसरातील विजापूर रोड येथे एका 23 वर्षीय महिलेने आपल्या 14 वर्षीय मुलीसह रेल्वेखाली उडी मारत जीवन संपवलं. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या घटनेनं नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

ADVERTISEMENT

Solapur news
Solapur news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

सोलापूर शहर हादरलं

point

आईसह लेकीचं टोकाचं पाऊल, कारण काय? 

Solapur news : विजयकुमार बाबर- सोलापूर शहरात मन हेलावून टाकणारा प्रकार उघडकीस आलाय. रविवारी पहाटे सुशीलनगर परिसरातील विजापूर रोड येथे एका 23 वर्षीय महिलेने आपल्या 14 वर्षीय मुलीसह रेल्वेखाली उडी मारत जीवन संपवलं. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या घटनेनं नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. महिलेची ओळख वर्षा पांडुरंग आढतराव आणि लेकीचं स्वरा पांडुरंग आढतराव अशी ओळख समोर आली. 

हे ही वाचा : विद्यार्थ्यांना मारहाणीचा आदेश कोणी दिला? राहुल गांधींच्या पत्रातून अमित शाहांना दोन तिखट सवाल

घडलेल्या घटनेनुसार, सोलापूर शहरातील पोलिसांनी पंचनामा करून दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात पाठवण्यात आले होते. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नातेवाईक आणि स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त आहे. 

आईसह लेकीचं टोकाचं पाऊल, कारण काय? 

प्राथमिक माहितीनुसार, आत्महत्येमागील नेमकं कारण समोर आलेले नाही. कौटुंबिक, आर्थिक किंवा इतक कोणत्या कारणाने पीडितेनं टोकाचं पाऊच उचललं असाव, याचा रेल्वे पोलीस तपास करत आहेत. संबंधित प्रकरणाची पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. 

हे ही वाचा : भावासोबत जाण्यापासून वडिलांनी रोखलं, 10 वर्षीय लेकाकडून 45 वर्षीय वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला

दरम्यान, आई आणि अल्पवयीन मुलीच्या मृत्यूने सुशीलनगर परिसरात शोक पसरला आहे. या दुर्दैवी घटनेनं अनेकांना हादरा बसला आहे. या आत्महत्येमागील पोलीस नेमकं कारण शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत.