Dhule Crime : बहिण माहेरी आली अन् घात झाला, मामाच्या घरी भाच्याची हत्या कुणी केली?
धुळ्यातील फिरदोस नगरमधील आपल्या माहेरी बहिण आली होती. या बहिणीच्या नवऱ्यानेच तिला आणि तिच्या दोन मुलांना माहेरी सोडले होते. त्यानंतर बहिणीचे पती कामावरून निघून गेले हो
ADVERTISEMENT
Dhule Crime news : धुळ्यातून एक हादरवून टाकणारी गुन्ह्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एका भाच्याची त्याच्याच मामाच्या घरी निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. मोहम्मद हाजीक एजाज हुसैन (वय 4) असे या मृत भाचाचे नाव आहे. या भाचाची त्याच्याच मामाने हत्या केल्याचे उघड झाले आहे. धुळ्यातील (Dhule) फिरदोस नगरमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने धुळ्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणात आता मामाने त्याच्या भाच्याची (Nephew) हत्या का केली? याचा तपास आता पोलीस करीत आहेत. (dhule crime news uncle kill his nephew dipping into the drum shocking crime story)
ADVERTISEMENT
धुळ्यातील फिरदोस नगरमधील आपल्या माहेरी बहिण आली होती. या बहिणीच्या नवऱ्यानेच तिला आणि तिच्या दोन मुलांना माहेरी सोडले होते. त्यानंतर बहिणीचे पती कामावरून निघून गेले होते. या दरम्यान मुलगी अनेक दिवसानंतर माहेरी आल्याने आई आणि मायलेकीमध्ये गप्पा टप्पा सुरु होत्या. यावेळी बहिणीचा लहान मुलगा हाजिक हुसैन व लहान भाऊ नुरूल अहमद नईम अहमद हे दोघे घरात खेळत होते.
हे ही वाचा : Raj Thackeray : “आपण पण वाहवत गेलो तर…”; जुना फोटो शेअर करत ठाकरेंनी व्यक्त केली चिंता
मामा आणि भाचा खेळत असतानाच दुसरा छोटा भाचा मोहम्मद हाजीक एजाज हुसैन रडत बसला होता. त्याच्या या रडण्याच्या आवाज असह्य झाल्याने मामाने भाच्याला बाथरूममधील पाण्याच्या प्लास्टिक ड्रममध्ये टाकले होते. त्यामुळे ड्रममध्ये बुडून भाचा मोहम्मद हाजीक एजाज हुसैनचा मृत्यू झाला. यावेळी लहान मुलाचा रडण्याचा आवाज अचानक बंद झाल्याने आई त्याला पाहायला गेली असता तिला हादराच बसला. कारण बाथरूममधल्या प्लास्टिक ड्रममध्ये खाली डोकं वरती पाय या अवस्थेत मुलगा आढळून आला होता.यावेळी मुलाला तत्काळ बाहेर काढत त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. या घटनेने धुळ्यात खळबळ माजली होती.
हे वाचलं का?
हे ही वाचा :Ganpat Gaikwad : “ज्यांना गद्दारी करून…”, भाजप आमदाराचे श्रीकांत शिंदेंच्या वर्मावर बोट
यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृत मोहम्मद हाजीक एजाज हुसैन याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला आहे. आता या शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे कारण काय समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच भाच्याच्या या हत्या प्रकरणात पोलिसांनी नुरुल अहमद नईम अहमद (वय 22) या मामाला फिरदौस नगर धुळे येथून अटक केली आहे. तसेच त्याच्याविरोधात चाळीसगांव रोड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. मामानेच भाचाचा खून केल्याने शहर पुन्हा एकदा हादरले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT