आजारपणासाठी सुट्टी घेतलेल्या महिला पोलिसाचा संशयास्पद अवस्थेत सापडला मृतदेह

मुंबई तक

ADVERTISEMENT

female police officer dead body found
female police officer dead body found
social share
google news

Female police officer dead body found in house : मुंबईच्या (Mumbai) नेहरू नगर भागात एका महिला पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह तिच्याच घरात संशयास्पद अवस्थेत आढळल्याची धक्कादायक घटना घडलीय. शीतल एडके असे या महिला पोलिसाचे (Women Police) नाव आहे. पोलिसांनी या घटनेत महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. दरम्यान या प्रकरणात नेमका महिला पोलिसाचा मृत्यू कसा झाला आहे? याचा तपास पोलीस (Police) करतायत. (female police officer dead body found suspicious condition in house mumbai case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरू नगर भागातील एका सोसायटीच्या रूममधून दुर्गंधी येत होती. यामुळे स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना (Police) दिली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठत फायर ब्रिगेडच्या जवानाच्या सहाय्याने घराचा दरवाजा तोडला होता. यावेळी घरात महिलेचा मृतदेह सापडला होता. यानंतर ही घटना उघडकीस आली होती.या घटनेनंतर परिसरात खळबळ माजलीय.

हे ही वाचा : पुणे हादरलं! लंडनमध्ये नोकरीला जाण्याआधीच वहिनीचा खून, पळून जाणारा दीरही ठार

घटनाक्रम काय?

झोन 6 चे डीसीपी हेमराज राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला ही एक पोलीस (Women Police) सब इन्स्पेक्टर होती तिचे नाव शीतल एडके आहे. शीतल कामगार नगरच्या शरद को ऑपरेटीव्ह सोसायटीच्या पाचव्या मजल्यावर राहायची. शीतल यांनी आजारपणाची सुट्टी घेतली होती. गेल्या साधारण दीड वर्षापासून त्या सुट्टीवर होत्या. या दरम्यान बुधवारी शेजाऱ्यांना त्यांच्या घरातून दुर्गंधी येत होती. अनेक दिवस घर देखील उघडले नव्हते. त्यामुळे स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पोलिसांनी घटनास्थळी अग्निशामक दलासोबत दाखल होतं दरवाजा तोडला होता. यावेळी शितल एडके (Women Police) यांचा मृतदेह किचनमध्ये सापडला.शितल यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. पोलिसांना प्राथमिक तपासात काही संशयास्पद देखील आढळलं नाही. त्यामुळे फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी बोलावून तपास करण्यात येत आहे.तसेच महिलेच्या मृतदेहाला पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. आता या पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यूचे कारण काय समोर येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या प्रकरणात (Alternative Dispute Resolution)पर्यायी विवाद निराकारण प्रकरणी तक्रार दाखल करून घटनेचा तपास करण्यात येत आहे.

हे ही वाचा : नवरा अचानक घरी आला, बायको 15 वर्षाच्या मुलासोबत होती ‘त्या’ अवस्थेत…

नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिला पोलिसाचा (Women Police) मृतदेह सापडला आहे. या प्रकरणात संशयास्पद असे काहीच सापडले नाही. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती डीसीपी हेमराज राजपूत यांनी दिली आहे. या

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT