Kalyan Crime: भावाचे अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे, बहीण करत होती Video शूट

रोहित गोळे

ADVERTISEMENT

kalyan crime brother indecent act with neighbors minor girl sister was doing video shoot latest marathi news maharashtra
kalyan crime brother indecent act with neighbors minor girl sister was doing video shoot latest marathi news maharashtra
social share
google news

Kalyan Minor Girl: कल्याण: कल्याण (Kalyan) पूर्वेत एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे, एका भाऊ आणि बहिणीने परिसरात राहणाऱ्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत (Minor Girl) अश्लील कृत्य केल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे एकीकडे भाऊ (Brother) हा अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करत असताना त्याची बहीण (Sister) मात्र हा सगळा घृणास्पद प्रकार मोबाइलवर शूट करत असल्याचं पोलीस तपासात समोर आली आहे. या संपूर्ण घटनेने कल्याणमध्ये एकच खळबळ माजली आहे. (kalyan crime brother indecent act with neighbors minor girl sister was doing video shoot latest marathi news maharashtra)

ADVERTISEMENT

पीडित मुलीने ही बाब घरी सांगताच तिच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ज्यानंतर कोळशेवाडी पोलीस ठाण्यात या दोन्ही भाऊ-बहिणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्यांना तात्काळ बेडया ठोकल्या.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सदर बारा वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी ही तिच्या कुटुंबासह कल्याण पूर्व परिसरात राहते. याच परिसरात अजय थापा व सपना थापा दोघे भाऊबहीण राहतात.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> मुंबई Tak Exclusive: DHFL चे मालक Wadhawan बंधूंचा कैदेत राजेशाही थाट, गृह खात्याला हादरवणारा रिपोर्ट

ही अल्पवयीन मुलगी घराच्या परिसरात खेळत असताना या दोघांची नजर तिच्यावर पडली. आरोपी अजय आणि सपना यांनी मुलीला फूस लावून त्यांच्या घरात नेलं. त्यानंतर अजयने या मुलीसोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. एकीकडे अजयचे हे अश्लील चाळे सुरू असताना त्याची बहीण सपना हिने हा किळसवाणा प्रकार तिच्या मोबाइल कॅमेरात शूट केला.

दरम्यान, या प्रकारामुळे मुलगी खूपच घाबरली आणि तिने याबाबतची सगळी हकीकत तिच्या घरी कुटुंबीयांना सांगितली. पीडितेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ज्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपी भाऊ-बहिणीला अटक केली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Viral: बापरे! महिलेच्या डोक्यात सापडला जिवंत किडा, डॉक्टरही हैराण

आता पोलीस या दोन्ही आरोपींची चौकशी करत असून त्यांनी आतापर्यंत इतर कोणाकोणासोबत अशा प्रकारचं कृत्य केलं आहे का? याचाही तपास करत आहेत. मात्र, अद्याप आरोपींनी त्याबाबत कोणतीही माहिती आपल्या जबाबात दिलेली नाही. दुसरीकडे पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपी भाऊ-बहिणीला कठोरातील कठोर शासन करण्याची मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT