Crime: कल्याणमध्ये पत्नी-मुलाची गळा दाबून हत्या, व्यावसायिकाने क्रूरपणे संपवलं कुटुंब; अन्…

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

kalyan crime wife and son killed after murder businessman husband absconded
kalyan crime wife and son killed after murder businessman husband absconded
social share
google news

Kalyan Crime: कल्याण: ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये (Kalyan) एका व्यावसायिकाने त्याच्या सात वर्षीय मुलासह पत्नीची गळा दाबून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दीपक गायकवाड असे या नराधम पतीचे नाव आहे. कल्याण शहरात नानूज वर्ल्ड नावाने खेळण्याच्या दुकानाचा मालक असलेल्या दीपकने केलेल्या कृत्याबाबत एकच खळबळ माजली आहे. दरम्या, स्वत: दीपकने देखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा मात्र दीपक तिथे नव्हता. त्यामुळे आता पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहेत. (kalyan crime wife and son killed after murder businessman husband
absconded)

नेमकी काय घटना?

कल्याण पश्चिमेतील रामबाग लेन नंबर तीन येथील ओम दिपावली इमारतीत दीपक गायकवाड हा त्याची पत्नी अश्विनी आणि सात वर्षाचा मुलगा आदिराज याच्यासोबत राहतो. आज दुपारी त्याने त्याच्या नातेवाईकाला फोन करुन त्याने पत्नी आणि मुलाची हत्या केल्याचं सांगितलं. तसेच स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती दिली.

हे ही वाचा>> 13 हजार न्यूड फोटो, फोन हाती घेताच गर्लफ्रेंड हादरली, मग ..

यानंतर नातेवाईकांनी तात्काळ दीपकचे घर गाठले असता त्यांना धक्का बसला. यावेळी त्यांना दीपकची पत्नी अश्विनी व सात वर्षाचा मुलगा आदिराजचा मृतदेह दिसून आला. पण दीपक मात्र पसार झाला होता. त्यामुळे त्यांनी या घटनेची माहिती महात्मा फुले पोलिसांना दिली. यानंतर महात्मा फुले पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पोलिसांनी मुलगा आणि त्याच्या आईचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. दीपक गायकवाड याचा कल्याण शहरात नानूस वर्ल्ड हे महागड्या खेळण्याचं दुकान आहेत. या प्रकरणाचा महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलीस दीपक चा शोध घेत आहेत.

हे ही वाचा>> Maharashtra Crime: महिला डॉक्टरबरोबर पती आणि सासूचे भयंकर कृत्य, दोघांनी गाठली क्रूरतेची हद्द

बायको आणि मुलाच्या हत्येचं ‘हे’ कारण?

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक गेल्या सहा वर्षांपासून एका फायनान्स कंपनी मध्ये काम करत होता. त्यानंतर त्याने व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला व्यवसाय चांगला चालला तेव्हा तो कर्मचाऱ्यांना चांगला पगारही देत ​​होता. कल्याणमध्ये त्याची तीन खेळण्यांची दुकाने आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या फायनान्स बिझनेसमध्ये खूप तोटा होत होता. त्यामुळे तो खूप अस्वस्थ होता, त्यातच आज त्याचा पत्नीशी काही वाद झाला. ज्यानंतर दीपकने हे टोकाचं पाऊल उचललं असावं असा अंदाज वर्तवला जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT