संशयाचे भूत! कल्याणमध्ये लिव्ह-इन पार्टनरची भोसकून हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

kalyan murder case suspecting live-in partner lover was killed in attacking knife
kalyan murder case suspecting live-in partner lover was killed in attacking knife
social share
google news

Kalyan Murder : गेल्या काही दिवसांपासून कल्याणमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. खून, मारमाऱ्या अशा प्रकारे वाढत असतानाच कल्याणमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कल्याण विजयनगरमधील आमराई परिसरात (Amrai Area) एका महिलेची चाकूने भोसकून हत्या (Murder) करण्यात आली आहे. यामध्ये ठार झालेल्या मुलीचे नाव रसिका असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ADVERTISEMENT

संशयाचा वाद टोकाला

या प्रकरणी पोलिसांनी विजय नावाच्या आरोपीला अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून रसिका आणि विजय हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र विजयला रसिकाच्या चारित्र्यावर संशय होता. त्यावरूनच विजय आणि रसिका या दोघांमध्ये त्यांच्यात वारंवार वाद होत होते. त्यामुळेच याच वादातून आज विजयने रसिकावर राहत्या घरी चाकूने वार करून तिची हत्या केली.

हे ही वाचा >> Solapur: पोलीस अधिकाऱ्याने डोक्यातच गोळी झाडून घेतली, असं काय घडलं?

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये

कल्याण पूर्वेमधील विजयनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून विजय आणि रसिका दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून विजय रसिकाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. रसिकावर संशय घेतला जात होता. त्यामुळेच दोघांमध्ये सातत्याने खटके उडत होते.

हे वाचलं का?

वादाने टोक गाठले

रसिकावर विजय संशय घेत होता, त्यावरुन त्यांच्यात आज जोरदार वाद झाला. त्या वादातूनच त्याने रसिकाला मारहाण केली होती. त्यानंतरही वाद सुरु राहिला होता, त्यातून रागाच्या भरात त्याने रसिकावर चाकूने वार केला होता. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती. त्या चाकू हल्ल्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर ही घटना पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी विजयला अटक केली.

हे ही वाचा >>

पोलिसांची धाव

पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांनी विजयला ताब्यात घेऊन घटनेची माहिती घेतली. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा नोंद करुन रसिकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याणमधील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. कोळशेवाडी पोलिसांनी अटक करुन पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT