Salman Khan: 'सलमानला मारण्यासाठी गार्डशीच केली होती मैत्री', हादरवून टाकणारी माहिती...

मुंबई तक

ADVERTISEMENT

 सलमानला मारण्यासाठी गार्डशीच केली होती मैत्री
सलमानला मारण्यासाठी गार्डशीच केली होती मैत्री
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शार्प शूटर सुक्खाने दिली माहिती

point

शार्प शूटरने सांगितला पूर्ण प्लॅन

point

पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती

Salman Khan Threat Case मुंबई : दसऱ्याला झालेल्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत. दररोज या प्रकरणात एक धक्कादायक अपडेट समोर येतेय. सुरूवातीला सलमान खानला दिलेली धमकी, त्यानंतर सलमानच्या घरावर झालेला गोळीबार आणि थेट त्याच लॉरेन्स गँगकडून बाबा सिद्दीकींची हत्या झाली. या संपूर्ण घटनाक्रमातून लॉरेन्स गँगची वाढत चाललेली दहशत दिसून येतेय. त्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं असून, पोलीस आता संशयितांची कसून चौकशी करत आहेत.  नुकताच पोलिसांनी याप्रकरणात 10 व्या संशयिताला अटक केली असून, त्याची पोलीस चौकशी करत आहेत. तसंच या संपूर्ण प्रकरणाचा संबंध थेट सलमान खानला दिलेल्या धमकीशीही दिला जोडला जातोय. या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सलमान खानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली असून, त्याच्या घरावर झालेल्या फायरिंगचाही तपास सुरू आहे. त्यातच एक नवी माहिती समोर आली आहे. (Lawrence Bishnoi Gang Sukhha Arrested in Case of firing on Salman Khan Galaxy House)

ADVERTISEMENT

हरियाणातील पाणीपतमधून अटक करण्यात आलेला शार्प शूटर सुक्खा याने लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार गँगच्या सांगण्यावरुन काही महिन्यांपूर्वी सलमानच्या पनवेलमधील फार्महाऊसची रेकी केली होती असं सांगितलं. तोच सलमान खानवर हल्ला करणार होता, मात्र त्याचा प्लॅन अयशस्वी झाला होता. फार्महाऊसची रेकी केल्यानंतर बिश्नोई गँगचा शूटर सुक्खाने गेटवर असणाऱ्या गार्डशी मैत्रीही केली होती. 
 

हे ही वाचा >>Maharashtra Voters Survey : जनतेची पसंती उद्धव ठाकरेंनाच? शिंदेंना बसणार धक्का? : सर्व्हे

 

शार्प शूटर सुक्खा हा सलमान खानला फार्म हाऊसवर जातानाच टार्गेट करण्याच्या प्रयत्नात होता असं पोलीस तपासात समोर आलं आहे. सलमानला आलेल्या धमकीच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी त्याचा जवाब नोंदवला असता आपल्याला लॉरेन्स बिश्नोई गँगवरच संशय असल्याचं सलमान म्हणाला होता. तसंच आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला धोका असल्याचंही सलमान म्हणाला होता. 

हे वाचलं का?

सुक्खाला कशी केली अटक?

हे ही वाचा >>Shiv Sena UBT: शिवसेना ठाकरे गटातच मुंबईच्या जागांवरुन राडा, 'मातोश्री'वर वेगवान घडामोडी

 

मुंबई पोलिसांना एक टिप मिळाली होती, त्यानंतर मुंबई पोलिसांनी हरियाणातील स्थानिक पोलिसांशी संपर्क साधत थेट पानीपतमधून त्याला सुक्खाला अटक केली होती. सुक्खा ज्या हॉटेलमध्ये थांबलेला होता, त्याच हॉटेलमध्ये थांबून हरियाणा पोलिसांसोबत संयुक्त कारवाई करत सुक्खाच्या मुसक्या आवळल्या होत्या. पोलिसांनी अटक केली त्यावेळी सुक्खा हा पूर्णपणे नशेत होता. त्याला आपलं नावंही सांगता येत नव्हतं. तसंच आपली ओळख लपवण्यासाठी त्यानं आपली दाढीही वाढवली होती. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT