लोन, फ्रॉड आणि हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! तुम्ही ‘या’ चुका तर करत नाही ना?
आता हे डिजिटल लोन अॅप नेमकी नागरीकांची कशी शिकार करतात? लोनच्या जाळ्यात त्यांना कसे ओढतात ? व अशा अॅप पासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
Loan Apps Fraud : मध्यप्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाल (Bhopal) एका कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येने हादरलं आहे. या घटनेत दोन लहान मुलांना विष देऊन आणि पती-पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली होती. डिजिटल लोनच्या (Digital loan App) जाळ्यात अडकून कुटुंबियांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. या घटनेने संपूर्ण देश हळहळला आहे. अशा घटनांमध्ये डिजिटल अॅप नागरीकांना लोनच्या जाळ्यात अशाप्रकारे ओढतात की त्यांच्यासमोर शेवटी आत्महत्येशिवाय कोणताच पर्याय उरत नाही. दरम्यान आता हे डिजिटल लोन अॅप नेमकी नागरीकांची कशी शिकार करतात? लोनच्या जाळ्यात त्यांना कसे ओढतात ? व अशा अॅप पासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? हे जाणून घेऊयात. (madhya pradesh bhopal suicide case how stay safe with loan app)
ADVERTISEMENT
नागरीकांची अशी फसवणूक करतात
भोपालच्या प्रकरणात भूपेंद्र विश्वकर्मा यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आल्याची माहिती दिली होती. या मेसेजमध्ये त्यांना वर्क फ्रॉम होम जॉब ऑफर करण्यात आला होता. फसवणूक करणारे नागरीकांना मनी फॉर लाईक अशी कामे दिली जातात. जसे युट्युब व्हिडिओ लाईक करणे किंवा इंस्टाग्रास रिल्स शेअर करण्यासाठी पैसे मिळतात. अशा कामात सुरुवातीला नागरीकांना चांगले पैसे मिळतात. पुढे आणखीण पैसे मिळण्याचे आमीष दाखवून त्यांना एका ग्रुपमध्ये अॅड केले जाते.
हे ही वाचा: Crime : ‘या’ अॅपमुळे कुटुंबच संपलं! मुलांना दिलं विष अन् पत्नीसह घेतला गळफास
या आमिषाला कुणीही बळी पडला की त्याला आणखीण कामे दिली जातात. तसेच पुढे त्यांना पैसे गुंतवायला देखील सांगितले जाते.आणि ज्यावेळेस व्यक्ती गुंतवलेले पैसै काढायची विनंती करतो. त्यावेळेस त्यांना आणखीण पैसे गुंतवण्यास सांगून या संपूर्ण जाळ्यात अडकवले जाते.
हे वाचलं का?
गुंतवणूकीसाठी कर्ज
भूपेंद्र विश्वकर्मा यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये असेही नमुद केले होते की, त्यांना कंपनीकडून लोन ऑफर करण्यात आली होती. अशा प्रकरणात एक फसवणूक करणाराच लोन ऑफर करत असतो. डिजिटल अॅपच्या माध्यमातून नागरीकांना ही लोन दिली जातात. या लोनमध्ये बाजार भावापेक्षा कितीतरी पट जास्त दराने कर्ज दिले जाते.
जशी एखादा व्यक्ती हे डिजिटल लोन अॅप आपल्या मोबईलमध्ये इन्स्टॉल करते, तसे ग्राहका्च्या फोनमधून सर्व परमिशन घेतली जातात. यामध्ये कॉन्टॅक्ट आणि फोटोचा सर्वाधिक समावेश असतो. दरम्यान ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला लोन फेडता येत नाही, त्यावेळेस त्यांच्या कॉऩ्टॅक्टमधील नागरीकांना फोन करून ग्राहकाची बदनामी केली जाते. कधी कधी तर लोन वसूल करण्यासाठी नातेवाईकांना धमकावले देखील जाते. तर कधी ग्राहकाचे फोटो मॉफ करून व्हायरल करण्याची धमकी दिली जाते.
ADVERTISEMENT
फसवणूक झाल्यास काय करावे?
अशा प्रकरणात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला अशा आमिषांना बळी पडले नाही पाहिजे. कोणत्याच वर्क फ्रॉम होमच्या कामाच्या आमिषाला बळी पडले नाही पाहिजे. जर तुम्ही कोणत्याही कंपनीत काम करण्याचा विचार करत असाल, तर सर्वांत आधी त्या कंपनीची माहिती लक्षात घ्या.
ADVERTISEMENT
जरी इस्टंट लोन अॅप किंवा वन टच अॅपवर दाखवण्यात येणारी ऑफर्स आकर्षक असली तरी अशा अॅपवर लगेच विश्वास ठेवू नका. कोणत्याही अशा अॅपवर लोन घेण्यापुर्वी कंपनी ग्राहकाकडून मोबाईलमधील इतर अॅपचे परमिशन मागते. याकडे विशेष लक्ष द्या. अॅप मोबाईलमध्ये कोण कोणत्या गोष्टीची परमिशन मागतेय, ती परमिशन देण्यापुर्वी आधी एकदा विचार करा.
जरी खूप काळजी घेऊन देखील तुम्ही या लोनच्या मायाजाळात फसलात तरी हिम्मत हारू नका.सर्वात आधी तुम्हाला पोलिसांना या घटनेची माहिती द्यायची आहे. कोणत्याही प्रकारच्या धमकीला घाबरायचे नाही आहे. या सपूर्ण प्रकरणाची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करा.अशाप्रकारे पोलीस तुम्हाला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी सहकार्य करू शकतात.
हे ही वाचा: मोठी बातमी: सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेबाबत राहुल नार्वेकरांना बजावली नोटीस, पण…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT