कुत्रा भुंकल्याने पोटवर लाथच मारली, तरुणाने महिलेचा जीवच घेतला, नेमकं प्रकरण काय?

ADVERTISEMENT

Madhya Pradesh Man kills woman after arguing over barking dog
Madhya Pradesh Man kills woman after arguing over barking dog
social share
google news

Crime News: मध्य प्रदेशातील इंदौर (Madhya Pradesh, Indore) शहरामध्ये कुत्र्याच्या भुंकण्यावरून झालेल्या वादातून एका 35 वर्षाच्या युवकाने वृद्ध महिलेच्या पोटावर लाथ मारल्याने (Beaten) तिचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे इंदौर शहरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली असून त्या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ही घटना शनिवारी रात्री घडली आहे. मुसाखेडा परिसरामध्ये ही घटना घडली असून संबंधित आरोपी हा शांतीनगर परिसरात राहणार आहे. तो आपले दुकान बंद करून घरी जात होता, त्यावेळी एका बिल्डिंगच्या खाली आल्यानंतर तेथील कुत्रा (Dog) त्याच्या अंगावर धावून गेला होता, व त्याला भूंकत होता. कुत्र्याने त्याची वाटच अडवून ठेवली होती. त्याला पुढे जाताच आले नव्हते.

पोटावरच लाथ मारली

बिल्डिंगजवळून जाताना त्या युवकाच्या अंगावर कुत्रा भूंकत असल्याने त्यानंतर त्याने आरडाओरड चालू केली. कुत्राही जोरजोरात ओरडत असल्याने कुत्र्याची मालकीन घराबाहेर आली. त्या बाहेर आल्यानंतर कुत्र्याच्या भुंकण्यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. तो वाद इतका टोकाला गेला की, आरोपीने महिलेच्या पोटावरच लाथ मारली, त्यावेळी महिला खाली पडली. त्यानंतर जवळच्या काही नागरिकांनी महिलेला रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

हे ही वाचा >> तरुणाचा सातवीतल्या विद्यार्थिनीसह गळफास, बापानेही उचललं टोकाचं पाऊलं; बुलढाणा हादरलं!

कुत्र्यावरून वाद टोकाला

कुत्रा भुंकण्यावरून झालेला वाद इतका टोकाला गेल्यानंतर आणि बाचाबाची झाल्यानंतर महिलेच्या पोटावर लाथ मारण्यात आली होती, आणि त्यातच महिलेचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून तरुणाला पोलिसांनी अटक केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

खुनाचा गुन्हा दाखल

कुत्र्याच्या भुंकण्यावरून हा वाद झाल्यामुळे महिलेच्या कुटुंबीयांनीही पोलिसात धाव घेऊन तरुणाविरोधात तक्रार करून त्याला अटक करण्याची मागणी केली होती, त्यानंतर पोलिसांनीही तात्काळ कारवाई करत तरुणाला अटक करून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> Mumbai Crime : मुंबई गँगवारने हादरली! चुनाभट्टी परिसरात अंदाधूंद गोळीबार; एक ठार, तीन जखमी

    follow whatsapp

    ADVERTISEMENT