धक्कादायक! वडिलच उठले मुलाच्या जीवावर; कारण ठरलं चिकन करी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Father killed his 32-year-old son just because he could not get chicken curry at home
Father killed his 32-year-old son just because he could not get chicken curry at home
social share
google news

Crime News : कर्नाटकमधील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील गुट्टीगर येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका पित्याने आपल्या ३२ वर्षांच्या मुलाचा चिकन करी न मिळाल्याने हत्या केली आहे. ही घटनेची माहिती मिळतातच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिवरामचे असं मृत मुलाचं नाव आहे. तर शीना असं वडिलांचं नाव आहे. (Father killed his 32-year-old son just because he could not get chicken curry at home)

ADVERTISEMENT

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शीना नावाच्या व्यक्तीच्या घरी चिकन करी बनवण्यात आली होती, मात्र तो घरी पोहोचेपर्यंत चिकन करी संपली होती. यामुळे शीनाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. शीनाने शिवरामशी वाद घालण्यास सुरुवात केली. सुरुवातीला शाब्दिक असणारे भांडण इतके वाढले की त्याने मुलाला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. यातच त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा : विकृतीचा कळस! अंध महिलेवर पतीसमोरच लैंगिक अत्याचार

पोलिसांचे दिलेल्या माहितीनुसार, शिवरामचे वडील शीना घरी परतले तेव्हा त्यांना घरात चिकन करी केली असल्याचे समजले. पण सर्वांचं जेवण झालं असल्याने शीनाला चिकन करी मिळाली नाही. या कारणावरून शीनाचा मुलगा शिवराम याच्याशी वाद झाला. या वादात शीना चिडला आणि शिवरामला काठीने मारहाण करू लागला.

हे वाचलं का?

हेही वाचा : Crime : पहिलं राखी बांधून घेतली पुन्हा तिच्यासोबतच केलं लग्न, नंतर केले हे कृत्य

याच वादात शीनाने आपल्या मुलाला काठीने एवढी मारहाण केली की त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. तसंच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT