Crime : हॉटेलवर बोलावून विवाहितेचा गळा घोटला, नंतर प्रियकरानं संपवलं आयुष्य

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

married women and her boyfriend dead found in oyo room delhi crime news
married women and her boyfriend dead found in oyo room delhi crime news
social share
google news

राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत ओयो रूममध्ये विवाहीत आणि तिच्या प्रियकराचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडलीय. यामध्ये प्रियकराने विवाहितेची गळा घोटून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.या हत्येनंतर प्रियकराने स्वत: आयुष्य देखील संपवलं आहे. या घटनेमागचं खरं कारण अद्याप समोर आले नाही आहे. मात्र पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटच्या आधारावर घटनेचा उलगडा होण्याची शक्यता आहे. (married women and her boyfriend dead found in oyo room delhi crime news)

ADVERTISEMENT

ईशान्य दिल्ली पोलीस स्टेशन हद्दीतील जाफराबाद परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या मेट्रो स्टेशन जवळील ओयो हॉटेलमध्ये एका विवाहितेने आणि प्रियकराने रूम बुक केला होता. या कपलने अनेक तास रूममध्ये घालवल्यानंतर चेकआऊटची वेळ उलटूनही दोघेही रूमबाहेर पडले नव्हते. त्यामुळे हॉटेल स्टाफला संशय बळावला. या संशयातून त्याने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

हे ही वाचा : NCP : ‘…तर जयंत पाटलांनी महायुतीत शपथ घेतली असती’, अजित पवार गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

पोलिसांनी घटनास्थळी हॉटेलमध्ये दाखल होऊन रूमचा दरवाजा तोडताच दोन मृतदेह आढळले होते. रूमच्या बेडवर 27 वर्षीय विवाहितेचा मृतदेह पडला होता. तर तिच्या प्रियकर सोहराबने रूममधील पंख्याला लटकून गळफास घेतला होता. या घटनेत प्रियकराने आधी विवाहितेचा गळा घोटून हत्या केली. या हत्येनंतर प्रियकराने गळफास लावून हत्या आत्महत्या केल्याची माहिती आहे.

हे वाचलं का?

हॉटेल स्टाफने दिलेल्या माहितीनूसार, जोडप्याने 4 तासासाठी रूम बुक केला होता. पण आठ तास उलटूनही जोडपं रूम बाहेर पडलं नव्हतं. त्यामुळे मी दरवाजा ठोठावून त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र आतून काहीच उत्तर आले नाही. त्यामुळे आम्ही पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

दरम्यान पोलिसांना घटनास्थळी हॉटेलमध्ये सुसाईड नोट सापडली आहे.या सुसाईड नोटमध्ये ”आम्ही दोघं एकमेकांवर खुप प्रेम करतो” असा मजकूर लिहला आहे. पोलिसांनी आता दोघांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. तसेच या घटनेमागचं सत्य उलगडण्याचा प्रयत्न सूरू केला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Devendra Fadnavis : ‘मी पुन्हा येईन’ व्हिडीओ भाजपने पुन्हा टाकला, कारण आलं समोर

दरम्यान या जोडप्याची ओळख पटली आहे. 28 वर्षीय प्रियकर सोहराब हा उत्तर प्रदेशातील मेरठ येथील रहिवासी होता, तर 27 वर्षीय आयेशा ही आधीच विवाहित होती आणि तिला दोन मुले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून दोघेही किती दिवसांपासून प्रेमसंबंधात होते, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मृत महिलेचा पती व्यावसायिक आहे. दोघांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. अशी माहिती ईशान्य दिल्लीचे डीसीपी डॉ जॉय तिर्की यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT