खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पाच जणांचा बुडून मृत्यू, आत्महत्या की अपघात?

मुंबई तक

Nagpur Crime News : नागपुर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात सुरगाव शिवारमध्ये काळीज हेलावून टाकणारी घटना घडली. पाणी साचलेल्या खड्ड्यात पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

ADVERTISEMENT

Nagpur crime news
Nagpur crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नागपुर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात सुरगाव शिवारमध्ये काळीज हेलावून टाकणारी घटना घडली.

point

पाणी साचलेल्या खड्ड्यात पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

Nagpur crime news : नागपुर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात सुरगाव शिवारमध्ये काळीज हेलावून टाकणारी घटना घडली. पाणी साचलेल्या खड्ड्यात पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तींमध्ये एक पुरूष, दोन महिला आणि दोन निष्पाप मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना कुही पोलीस ठाणे परिसरात 12 मे दिवशी घडली आहे. 

हेही : बनावट दारू प्यायल्याने तब्बल 14 जणांचा मृत्यू, 6 जण रुग्णालयात... धक्कादायक घटनेनं दोन गावं हादरली

मृत व्यक्तींमध्ये एहतोशाम अन्सारी (26 वय), रोशनी चौधरी (32वय), अंजली चौधरी (25 वय), मोहित चौधरी (10 वय) आणि लक्ष्मी चौधरी (8 वय) अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्या वैयक्तिक कारणाने ते खड्ड्यात पाणी साचलेल्या ठिकाणी गेले. त्यावेळी त्यांना खड्डा असल्याचे जाणवलेच नाही. अशावेळी त्यांचा बुडून मृत्यू झाला. 

संबंधित प्रकरणाची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी स्थानिक बचाव पथकाच्या मदतीने  सर्वच मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली की, प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचे दिसून आले. परंतु आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

हेही : पाकिस्तानच्या पुन्हा कुरापती? जम्मू काश्मीरमधील सांबामध्ये दिसले संशयास्पद ड्रोन, आर्मीने काय म्हटलं?

संबंधित प्रकरणाच्या घटनेतील समोर कारण आता समोर आले आहे. यादरम्यान, पोलिसांनी जवळच्या लोकांची आणि मृतांच्या नातेवाईकांची चौकशी सुरू आहे. अशातच मृतांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी नागपूर शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. 

दरम्यान, या घटनेत मृत असलेल्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, या प्रकरणाचं गुढ अद्यापही उकललं गेलं नाही. यासंबंधित पोलीस पुढील तपास करत असल्याचं सांगत आहेत. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp