पत्नीच्या अनैतिक संबंधाबाबत पतीला समजलं! नवऱ्याच्या डोळ्यात फेकली मिरची पावडर, दोघांनी नंतर बेडवरच...
Extra Marital Affair Shocking News: कर्नाटकच्या तुमकुरू येथे एका महिलेनं प्रियकरासोबत मिळून तिच्या पतीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह घरापासून 30 किलोमीटर दूर एका विहिरित फेकला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पत्नीने पतीच्या डोळ्यात मिरची टाकून केली निर्घृण हत्या

महिलेनं प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं

त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय?
Extra Marital Affair Shocking News: कर्नाटकच्या तुमकुरू येथे एका महिलेनं प्रियकरासोबत मिळून तिच्या पतीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह घरापासून 30 किलोमीटर दूर एका विहिरित फेकला. पोलिसांना मृत व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी तपास सुरु केला. यादरम्यान, मृताच्या घरी मिरची पावडर मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नीचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासले. तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. तपासादरम्यान, आरोपी महिलेनं हत्येचा गुन्हा कबूल केला. अनैतिक संबंधांमुळे तिने हे पाऊल उचलल्याचं म्हटलं.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण टिपटूर तालुक्यातील कडाशेट्टीहल्ली गावातील आहे. येथील एका महिलेनं तिच्या प्रियकरासोबत मिळून तिच्या पतीला तडफडून मारलं. त्यानंतर मृतदेह 30 किलोमीटर दूर असलेल्या एका जंगलात विहिरित फेकून दिला. शंकरमूर्ती असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
हे ही वाचा >> ताट, लाटणं, उलाथणं घेऊन बदडलं, तरूणाला घेरून चोपलं...हॉटेल भाग्यश्रीवर पुन्हा काय राडा?
सुमंगला असं महिला आरोपीचं नाव असून नागराजू असं तिच्या प्रियकराचं नाव आहे. दोघांवरही हत्येचा कट रचणे आणि हत्या करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल आहे. सुमंगला टिपटूरमध्ये कल्पतरू कॉलेज गर्ल्स हॉस्टेलमध्ये काम करायची. पोलिसांच्या माहितीनुसार, सुमंगलाने तिच्या पतीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि त्यानंतर त्याला लाकडाने मारहाण केली. नंतर त्याचा गळा दाबून हत्या केली.
पोलिसांनी आरोपींना कसं पकडलं?
शंकरमूर्ती बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच नॉनविनाकेरे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली. तपासादरम्यान, पोलिसांना मृताच्या फार्महाऊसमध्ये बेडवर मिरची पावडर सापडली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी सुमंगलाचे कॉल डिटेल्स चेक केले. त्यानंतर पोलिसांनी सुमंगलाची कसून चौकशी केली. त्यामुळे सुमंगलाने पतीची हत्या केल्याचं कबूल केलं. तिने पोलिसांना सांगितलं की, नागराजू नावाच्या एका व्यक्तीसोबत तिचे अनैतिक संबंध होते. या संबंधाला पतीचा विरोध होता. त्यामुळे पतीची हत्या केली, असं तिने पोलिसांना सांगितलं.