टेक्नॉलॉजी वापरुन लोकांना गंडवलं, भक्तांच्या मोबाईलमधून मिळवायचा 'ती' माहिती, नशेच्या गोळ्या देऊन...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद तामदार हा आधी भक्तांना आपल्या विश्वासात घ्यायचा. त्यानंतर त्यांच्या मोबाइल फोनमध्ये त्यांच्या परवानगीशिवाय ‘एयरड्रॉयड किड्स’ नावाचं हेरगिरी करणारं ॲप इन्स्टॉल करायचा.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुण्यातील भोंदूबाबा पोलिसांच्या ताब्यात

भक्तांना काय काय करायला सांगायचा?
पुणे : पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात स्वत:ला ‘दैवी शक्ती’ प्राप्त झाल्याचा दावा करणाऱ्या एका बाबाचा भांडाफोड झाला आहे. बाबा म्हणवणाऱ्या प्रसाद दादा भीमराव तामदार या ढोंगी माणसाचा घृणास्पद चेहरा उघड झाला आहे. सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स असलेला हा बाबा आता गंभीर आरोपांखाली बावधन पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर भक्तांचा विश्वासघात करून त्यांच्यावर पाळत ठेवण्याचा, नशेच्या गोळ्या देण्याचा गंभीर आरोप आहेत.
हे ही वाचा >> शिक्षिकेनं विद्यार्थ्याला पटवलं अन् घरी बोलावलं..पण रूममध्ये घडलं भयंकर! पोलिसांनाही धक्का बसला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद तामदार हा आधी भक्तांना आपल्या विश्वासात घ्यायचा. त्यानंतर त्यांच्या मोबाइल फोनमध्ये त्यांच्या परवानगीशिवाय ‘एयरड्रॉयड किड्स’ नावाचं हेरगिरी करणारं ॲप इन्स्टॉल करायचा. या ॲपच्या मदतीने तो भक्त कुठे आहेत, कोणासोबत आहेत आणि काय करत आहेत याची माहिती मिळवायचा. यामुळे भक्तांना वाटायचं की, बाबाकडे खरोखरच काही अलौकिक शक्ती आहे.
आश्रमात बोलवून रात्रीच्या वेळी भलतंच काहीतरी करायचा बाबा
तामदार आपल्या आश्रमात भक्तांना कॅम्पच्या नावाखाली बोलवायचा. यावेळी तो त्यांचे मोबाइल फोन वेगळे ठेवायला सांगायचा आणि रात्रीच्या वेळी ‘जप’ करण्यास सांगायचा. त्याचा दावा होता की, 48 तासांपेक्षा जास्त वेळ झोप न घेता जप केल्यानं आध्यात्मिक लाभ मिळतो. मात्र, रात्री एक वाजण्याच्या सुमारास जेव्हा भक्त थकून झोपेच्या अधीन व्हायचे, तेव्हा तो त्यांना ‘ॲसिडिटी’पासून वाचण्यासाठी म्हणून पाण्यात नशीली गोळी मिसळून द्यायचा आणि गैरप्रकार करायचा.
हे ही वाचा >> सोनम-मुस्कानपेक्षाही खतरनाक निघाली सुमंगला! डोळ्यात मिरची पावडर टाकून पतीचा गेमच केला, पोत्यात मृतदेह भरला अन्..
दरम्यान, या सगळ्या प्रकारामुळे भक्तांचा विश्वासघात झाल्याचं उघड झालं आहे. बावधन पोलिसांनी तामदारला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. पोलिसांना संशय आहे की, आणखी काही भक्त या ढोंगी बाबाच्या जाळ्यात अडकले असावेत.