हनिमूनसाठी हॉटेलच्या रुममध्ये नेलं अन् पतीला पनीर खाऊ घातलं, पुढची कहाणी तुमच्याही अंगावर आणेल काटा!
Crime News : पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीला एका निर्जनस्थळी नेलं आणि बेदम मारहाण करत खून केला. पत्नीला आपल्या पतीकडून एक दोन नाहीतर तब्बल अठरा एकर जमीन हडप करायची होती असा यामागचा मुख्य हेतू होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महिलेकडून जबलपूरमध्ये मोठा कांड
प्रियकराच्या मदतीने पतीला निर्जनस्थळी नेलं आणि केली हत्या
crime news : जबलपूरमध्ये एक धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. लग्नानंतर पार पडलेल्या विधीनंतर पत्नीनं आपल्या पतीची हत्या करत मोठं कांड केलंय. पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीला एका निर्जनस्थळी नेलं आणि बेदम मारहाण करत खून केला. तरुणीला संबंधित व्यक्तीकडून एक दोन नाहीतर तब्बल अठरा एकर जमीन हडप करायची होती असा यामागचा मुख्य हेतू होता.
हेही वाचा : पुण्यात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला टोळक्यांकडून रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण
पतीचं नाव इंद्र कुमार तर पत्नीचं नाव खुशी तिवारी अशी त्यांची ओळख समोर आली. पतीकडून तब्बल अठरा एकर जमीन हडप करत महिलेनं मोठं कांड केलं. हनिमूनपूर्वी पत्नीनं आपल्या पतीच्या जेवनात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. तो त्याच ठिकाणी बेशुद्ध पडला होता. तेव्हा खुशी तिवारी, तिचा प्रियकर आणि ड्रायव्हर शमसुद्दीनसह त्याला गाडीत टाकून निर्जनस्थळी नेलं. तेव्हा त्याच्यावर चाकूने सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह झुडपात टाकण्यात आला.
'असा' रचला हत्येचा कट
इंद्र कुमारच्या लग्नाचं वय निघून गेलं होतं. त्याच्याकडे तब्बल अठरा एकर जमीन होती. मात्र, जीवनसाथी नसल्याने त्याला एकटं एकटं वाटू लागलं होतं. त्याने आपल्या मनातील सल अनिरुद्ध नामक कथाकाराच्या प्रवचनात सांगितली. त्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्याचवेळी गोरखपूरमध्ये राहणाऱ्या खुशीने आपल्या प्रियकरासोबत मोठा कट रचला. इंद्रची जमीन हडप करण्यासाठी खुशीने लग्न केलं आणि रचलेल्या कटानुसार इंद्र कुमारची हत्या केली.
दरम्यान, कौशने जबलपूरमधील इंद्र कुमारशी संपर्क साधला आणि स्वत: संदीप आणि साहिबा बानो अशी ओळख सांगितली. त्याने सांगितलं त्याला त्याच्या बहिणीचा विवाह इंद्रशी लावून द्यायचा होता. या प्रस्तावावर इंद्र तिवारी खूश झाला आणि काही दिवसांत इंद्र हा साहिबा उर्फ खुशी तिवारीशी फोनवर बोलू लागला. हळूहळू ओळख वाढू लागल्याने एकमेकांचा विश्वास वाढू लागला. 3 जून रोजी संदीपने इंद्रला गोरखपूर येथे आणलं आणि इंद्र दोघांसोबत राहू लागला.










