गे डेटिंग अ‍ॅपवर भेट, बँक मॅनेजर ब्लॅकमेलर्सचं टार्गेट, खासगी भेटीतले क्षण शूट केले आणि नंतर सुरू केला खेळ

मुंबई तक

ही घटना अकोला शहरातील जुने शहर परिसरात राहणाऱ्या एका बँक मॅनेजरसोबत घडली. बँक मॅनेजरची एका गे डेटिंग अ‍ॅपवर दोन तरुणांशी ओळख झाली. हळूहळू त्यांचं संभाषण वाढलं आणि एका भेटीचं नियोजन झालं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

अकोल्यात बँग मॅनेजरला कसं टार्गेट केलं?

point

गे डेटिंग अ‍ॅपची नेमकी भानगड काय?

अकोला : अकोला जिल्ह्यातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका बँक मॅनेजरला गे डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून फसवून त्याचा अश्लील व्हिडिओ बनवला गेला आणि लाखो रुपयांची खंडणी मागण्यात आली. पीडिताच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे.

ही घटना अकोला शहरातील जुने शहर परिसरात राहणाऱ्या एका बँक मॅनेजरसोबत घडली. बँक मॅनेजरची एका गे डेटिंग अ‍ॅपवर दोन तरुणांशी ओळख झाली. हळूहळू त्यांचं संभाषण वाढलं आणि एका भेटीचं नियोजन झालं. याचवेळी आरोपींनी नियोजनबद्धरित्या पीडिताला एका खासगी ठिकाणी बोलावलं, तिथे त्याला अश्लील कृत्यांमध्ये सामील करून त्याचा व्हिडिओ गुप्तपणे रेकॉर्ड केला.

हे ही वाचा >> टेक्नॉलॉजी वापरुन लोकांना गंडवलं, भक्तांच्या मोबाईलमधून मिळवायचा 'ती' माहिती, नशेच्या गोळ्या देऊन...

त्यानंतर ब्लॅकमेलिंगचा सिलसिला सुरू झाला. आरोपींनी पीडिताला धमकी दिली की, जर त्यानं पैसे दिले नाहीत, तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला जाईल. सततच्या धमक्यांमुळे आणि मानसिक त्रासाला कंटाळून अखेर पीडित बँक मॅनेजरने खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रार मिळताच खदान पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज केदार यांनी एक पथक तयार करून कारवाई सुरू केली. बँक मॅनेजरच्या मदतीने सापळा रचला गेला आणि योजनेच्या आधारे दोन्ही आरोपी, मनीष नाईक आणि मयूर बागडे, यांना रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्यावर खंडणी, ब्लॅकमेलिंग, अश्लील कृत्य आणि आयटी कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.