Crime: घर मालकाच्या पोरीवर भाडेकरूचा डोळा, तब्बल 6 वर्षे…पुण्यात काय घडलं?
फोटो दाखवून व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने पीडित मुलीला मारहाण केली. तसेच जबरदस्तीने तिच्यासोबत शारिरीक संबंध देखील ठेवले. इतकंच नाही तर वारंवार तिला धमकी देऊन तिचा शारिरिक आणि अनैसर्गिक छळ देखील केला.
ADVERTISEMENT
Pune Crime News : ‘विद्येचं माहेरघर’ आणि ‘सांस्कृतिक राजधानी’ अशी बिरूदावली मिरवणाऱ्या सुसंस्कृत पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका भाडेकरूने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे एक दोनदा नव्हे तर तब्बल सहा वर्ष तो मुलीवर बलात्कार करत होता. आता त्या भाडेकरूच्या वाईट कृत्याचा पर्दाफाश झाला आहे. धक्कादायक म्हणजे या सर्व घटनेत त्याची बायको देखील भागिदार होती. या प्रकरणी आता पोलिसांनी दोन्ही भाडेकरू पती-पत्नीला अटक केली आहे. या घटनेने पुण्यात खळबळ माजली आहे.(pune crime news tenant’s rap owner daughter viral intimate photo pune crime story)
ADVERTISEMENT
पुण्यातील सोमवार पेठ परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेतील आरोपी समीर शेख आणि त्याची पत्नी पीडितेच्या वडिलांच्या भाड्यात घरात राहायला आले होते. या दरम्यान समीर शेखने घर मालकाच्या मुलीसोबत ओळख वाढवली होती. ओळख वाढवल्यानंतर समीरने तिच्य़ाशी मैत्री करत तिचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर त्याने तिच्यासोबत काही फोटो काढले होते.
हे ही वाचा : RSS on Caste Census : जातनिहाय जनगणनेबद्दल संघाने बदलली भूमिका, पण…
हे फोटो दाखवून व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने पीडित मुलीला मारहाण केली. तसेच जबरदस्तीने तिच्यासोबत शारिरीक संबंध देखील ठेवले. इतकंच नाही तर वारंवार तिला धमकी देऊन तिचा शारिरिक आणि अनैसर्गिक छळ देखील केला. अल्पवयीन मुलगी हा सर्व प्रकार निपूटपणे सहन करत होती. तसेच आरोपीची बायको देखील या कटात सामील होती. आरोपीच्या पत्नीने मुलीचा आणि पतीचा फोटो कुटुंबियांना दाखवून मारून टाकण्याचीही धमकी दिली. आरोपी पती-पत्नीने तब्बल सहा वर्ष तिचे लैंगिक शोषण करून तिचा छळ केला होता.
हे वाचलं का?
अखेर पीडीत मुलीने या प्रकरणी आता पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून आरोपी पती सिजु समीर शेख ( 26) व त्याची पत्नी सोफियाना सिजू शेख यांच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात बलात्कारासह पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस बंडगर करत आहेत.
हे ही वाचा : IPL 2024 : रोहितला कॅप्टन्सीवरून काढल्यानंतर ‘हे’ तीन खेळाडू सोडणार मुंबई इंडियन्सची साथ?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT