Pune : लॉरेन्स गँगचे हात पुण्यापर्यंत? प्रसिद्ध सराफा व्यावसायिकाला धमकी, मेलमध्ये म्हटलंय...
लॉरेन्स बिश्नोईने त्याच्या काही सहकाऱ्यां घेऊन देशभरात नेटवर्क तयार केलेलं असून, त्यामाध्यमातून अनेकांना खंडणीसाठी धमकी दिल्या जात असल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
ल़ॉरेन्स गँगकडून सराफा व्यावसायिकाला धमकी
धमकी देत खंडणीची मागणी
पुणे पोलिसांकडून तपास सुरू
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई गँग पुन्हा एकदा महाराष्ट्रात सक्रीय असल्याचं समोर आलंय. काही दिवासांपूर्वी मुंबईत झालेल्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई याच्या गँगने घेतली आहे. यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगचं देशभरातील नेटवर्क समोर आलंय. दरम्यान याच लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने पुण्यातील एका सराफा व्यावसायिकाला धमकी आली आहे. त्यामुळे पोलिसांसमोर या गँगचा बिमोड करण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे. (Pune jeweller threatend by lawrence bishnoi gang for extorsion)
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात कॉन्स्टेबल सस्पेंड, गोळीबारावेळी फटाक्यांच्या आवाजामुळे...
पुण्यातील एका प्रसिद्ध सराफा व्यावसायिकाला ल़ॉरेन्स गँगकडून धमकी देत खंडणीची मागणी करण्यात आल्याचं समोर आलंय. मेल पाठवणाऱ्यानं आपण लॉरेन्स गँगकडून हा मेल पाठवत असल्याचं म्हटलंय. पुणे पोलीस सध्या या प्रकरणाची सत्यता पडताळत असून, खरंच हा मेल लॉरेन्स गँगकडून आला आहे का याची चौकशी करत आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने याबद्दल बोलताना सांगितलं की, आम्ही या मेलची चौकशी करत आहोत. तसंच हा एखादा फ्रॉड मेल तर नाही ना, याचीही चौकशी करत आहोत.
हे ही वाचा >>Shrikant Pangarkar: गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदे गटात प्रवेश, 'या' पदावर केली नियुक्ती
लॉरेन्स बिश्नोई गँगने मागच्या काही दिवसांमध्ये अनेक बड्या लोकांना धमकी देऊन खंडणी मागितल्याचं समोर आलं आहे. लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी मिळून देशभरात तयार केलेल्या नेटवर्कच्या माध्यमातून अनेकांना टार्गेट करण्यात आलं आहे. मात्र त्यांनी टार्गेट केलेल्या या यादीत सर्वात वर असलेलं नाव म्हणजे सलमान खान. अभिनेता सलमानला यापूर्वी अनेकदा लॉरेन्स गँगकडून धमकी आली. तसंच एकदा त्याच्या घरावरही गोळीबारही झाला होता. त्यानंतर आता थेट बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमध्ये लॉरेन्स बिश्नोईला संबंध आल्यानं पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालंय.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT