Crime News: वृद्ध आई-वडिलांची हत्या! घरातून मुलगा बेपत्ता, नेमकं काय घडलं?
बंगळुरुतून (bengaluru) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत वृद्ध आई-वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची हादरवून टाकणारी घटना घडली आहे. (61 वर्षीय) भास्कर आणि (60 वर्षीय) शांता अशी मृत आई-वडिलांची नावे आहेत.या दोघांनाही साजिथ आणि शरथ नावाची दोन मुले आहेत.
ADVERTISEMENT
बंगळुरुतून (bengaluru) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत वृद्ध आई-वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची हादरवून टाकणारी घटना घडली आहे. (61 वर्षीय) भास्कर आणि (60 वर्षीय) शांता अशी मृत आई-वडिलांची नावे आहेत.या दोघांनाही साजिथ आणि शरथ नावाची दोन मुले आहेत. मात्र आई-वडिलांच्या हत्येनंतर छोटा मुलगा शरथ हा बेपत्ता झाला आहे. त्यामुळे छोट्या मुलानेच हत्या केल्याचा संशय पोलिसांना बळावला आहे. त्यामुळे पोलिसांनी (police) घटनास्थळी दाखल होत तपास करून छोट्या मुलाचा शोध सुरु केला आहे. या घटनेचा तपास पोलीस करीत आहे. (son killed mother and father bengaluru crime story)
ADVERTISEMENT
बंगळुरुच्या (bengaluru) कोडिगेहल्ली परिसरात भास्कर आणि शांता आपला मोठा मुलगा साजिथ आणि छोटा मुलगा शरथ सोबत राहत होते. भास्कर हे एका कॅंटीनमध्ये कॅशियरचे काम करायचा तर शांता या मॅंगलोरच्या रहिवाशी होत्या. दरम्यान सोमवारी 17 जुलैला रात्री 9 च्या सुमारास भास्कर आणि शांता यांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
हे ही वाचा : लव, सेक्स आणि धर्मांतर! मीरा रोडमधील 22 वर्षीय तरूणीसोबत काय घडलं?
मोठा मुलगा साजिथने पोलिसांना दिलेल्या माहितीनूसार, साजिथने दरवाज्याच्या गेटला ठोकलं, मात्र समोरून काहिच उत्तर आले नाही. त्याने धक्का मारून गेट उघडण्याचा देखील प्रयत्न केला मात्र तेही शक्य झालं नाही. शेवटी साजिथने घाबरून शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. यानंतर शेजाऱ्यांनी मिळून दरवाजा तोडला असता साजिथचे आई-वडील मृताअवस्थेत आढळले होते. या घटनेने साजिथ आणि शेजाऱ्यांना मोठा धक्काच बसला आहे.
हे वाचलं का?
या घटनेची माहिती लगेचचं पोलिसांनी देण्यात आली होती. यानंतर घटनास्थळ गाठून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. विशेष म्हणजे या घटनेत आई-वडिलांच्या हत्येनंतर छोटा मुलगा शरथ हा फरार होता. त्यामुळे पोलिसांचा संशय शरथवरच बळावला आहे. शरथच्या वागणूकीमुळे घरात नेहमी भांडणे व्हायची. त्यामुळे पोलिसांना शरथवर संशय आहे. दरम्यान आता शरथला ताब्यात घेतल्यानंतर त्यानेच आई-वडिलांची हत्या केली आहे का? हे हत्याकांड त्यानेच घड़वून आणले आहे का? तसेच या हत्याकांडात इतर कोणी सहभागी होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे.दरम्यान आता या प्रकरणात पोलिसांनी शरथचा शोध सुरु केला आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
हे ही वाचा : Crime: मेहुणीसोबत संबंध…,तरूणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT