Crime : दिल्लीहून आला अन् दोन्ही पत्नींनी चाकूने वार करत संपवले
. पोलिसांनी या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याबरोबरच आलमगीरच्या हत्येप्रकरणी सलमा आणि अमीना यांना अटक केली.
ADVERTISEMENT
Crime news marathi : दिल्लीहून घरी आलेल्या पतीची दोन्ही पत्नींनी मिळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही पत्नींनी चाकूने हल्ला केला. यात पती जखमी झाला. रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्याचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील भेल्डी पोलीस स्टेशन हद्दीतील बेडवालिया रायपुरा येथील रहिवासी आलमगीर अन्सारी (45 वर्ष) यांचा सुमारे 10 वर्षांपूर्वी पहिला विवाह झाला होता. पत्नी सलमा ही सारण जिल्ह्यातील गारखा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंतामणगंज गावातील रहिवासी आहे. मात्र लग्नानंतर लगेचच आलमगीरचे पहिल्या पत्नीसोबत मतभेद झाले. त्यामुळे सलमा पतीचं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी राहू लागली. दरम्यान, 6 महिन्यांपूर्वी आलमगीरने दिल्लीला जाऊन पश्चिम बंगालची रहिवाशी असलेल्या अमिनासोबत लग्न केले.
वाचा >> Ajit Pawar: अजितदादांचा हट्ट, शिंदेंसाठी इकडे आड तिकडे… खातेवाटपाचं घोडं ‘इथे’ अडलंय!
मृताच्या नातेवाईकांनी सांगितले की, आलमगीरची पहिली पत्नी सलमा काही दिवसांपूर्वी दिल्लीला गेली होती. तिथे गेल्यानंतर ती आपल्या सवतीला म्हणजेच पती आलमगीर यांच्या दुसरी पत्नी अमिना हिला तिच्या माहेरी चिंतामणगंज येथे आणले. काही दिवसांपासून दोघीही तिथे एकत्र राहतात.
हे वाचलं का?
आलमगीर घरी आल्यानंतर काय घडलं?
दरम्यान, दिल्लीत राहणारा आलमगीर बकरीदनिमित्त आपल्या गावी आला होता. माहिती मिळताच 9 जुलै रोजी दुपारी दोन्ही पत्नी एकत्र आलमगीरच्या घरी म्हणजे सासरच्या घरी पोहोचल्या. तिघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला.
ADVERTISEMENT
या वादात सलमाने चाकू काढून पती आलमगीरवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात आलमगीर गंभीर जखमी झाला. कसेबसे नातेवाईकांनी आलमगीरला गारखा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. मात्र त्याची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला थेट दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले.
ADVERTISEMENT
जखमी आलमगीरला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र, त्याचवेळी वाटेत असतानाच आलमगीरचा मृत्यू झाला.
या सगळ्या प्रकरणाची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर त्यांनी तिथे पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी छपरा सदर रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याबरोबरच आलमगीरच्या हत्येप्रकरणी सलमा आणि अमीना यांना अटक केली.
वाचा >> दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात पवारांचा ‘हा’ शिलेदार उभं करणार आव्हान?
भेल्डीचे पोलीस अधिकारी संतोष कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दोन्ही पत्नींना अटक करण्यात आली आहे. घटनेचा तपास करण्यात येत आहे.
दुसरीकडे, या घटनेबाबत मारहौराचे डीएसपी नरेश पासवान यांनी सांगितले की, मृताच्या नातेवाईकांनी बेडवालिया येथे पतीला भोसकून ठार केल्याचा आरोप दोन्ही पत्नींवर केला आहे. पोलिसांनी दोघींनाही अटक केली आहे. दोन्ही पत्नींनी पतीची हत्या का केली, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT