Sex Racket: हॉटेलमध्ये वासनेचा खुला बाजार, मागणीनुसार मिळत होत्या मुली

मुंबई तक

ADVERTISEMENT

up crime sex racket exposed caught in ncr hotel girls met on demand five arrested
up crime sex racket exposed caught in ncr hotel girls met on demand five arrested
social share
google news

Sex Racket Bust: गाझियाबाद: उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद पोलिसांनी मोठ्या सेक्स रॅकेटचा (Sex Racket) भांडाफोड केला आहे. यावेळी पोलिसांनी गाझियाबादमधील हॉटेल मालक आणि त्याच्या व्यवस्थापकासह एकून पाच जणांना हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय चालवत असल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने आज (28 ऑक्टोबर) ही माहिती दिली. हे हॉटेल गाझियाबादच्या इंदिरापुरममधील नीती खांड या भागात आहे. (up crime sex racket exposed caught in ncr hotel girls met on demand five arrested)

ADVERTISEMENT

सहाय्यक पोलीस आयुक्त भास्कर वर्मा यांनी सांगितले की, ‘हॉटेल मालक सचिन शर्मा आणि व्यवस्थापक अमित कुमार व्यतिरिक्त, पोलिसांनी गुरुवारी रात्री गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून हॉटेलमधील तीन संशयित ग्राहकांना देखील अटक केली.’

वर्मा यांच्या म्हणण्यानुसार, नोएडा, गाझियाबाद आणि दिल्ली येथील पाच महिलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच काही ‘आक्षेपार्ह’ वस्तू देखील जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी हॉटेलचे रजिस्टर आणि मोबाइल फोनही जप्त केल्याचे त्यांनी सांगितले.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> गोष्ट एका सायनाईड जॉलीची! 14 वर्षात एकाच घरातील 6 हत्या, नेमकं प्रकरण होतं काय?

शर्मा यांनी दोन वर्षांपूर्वी हे हॉटेल भाड्याने घेतले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या महिलांनी सांगितले की, शर्मा आणि कुमार यांनी त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले होते.

मुंबईत वासनेचा बाजार, हायप्रोफाईल सेक्स रॅकेट

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबईत देखील एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केलं होतं. अंधेरी पश्चिम म्हाडा परिसरात मसाज स्पाच्या नावाखाली हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या ‘रिव्हायव्हल वेलनेस’वर गुन्हे शाखेच्या समाजसेवा शाखेने छापा टाकून 9 मुलींची सुटका केली. याशिवाय स्पा मॅनेजरलाही अटक करण्यात आली आहे, तर मुख्य आरोपी स्पाचा मालक फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Crime : 22 दिवसांनी होते तरुणीचे लग्न, मित्रासोबत हॉटेलमध्ये थांबली अन्…

पोलिसांनी सांगितले की, स्पा सेंटरमधून मणिपूरमधील 4, मिझोराममधील 2, मेघालयातील 1, कोलकातामधील 1 आणि लखनऊमधील 1 मुलींची सुटका करण्यात आली आहे. स्पाचा व्यवस्थापक चंद्रकांत उर्फ ​​बंटी याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. तर स्पा मालक अतुल धिवर हा फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक प्रयत्नशील आहे. स्पा सेंटरच्या आडून सेक्स रॅकेटचा धंदा सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT