हात-पाय बांधून शरीराची केली चाळण, लग्नानंतर तरुणासोबत नेमकं घडलं काय?
लग्नासाठी म्हणून बाहेर पडलेल्या तरुणाची हत्या करुन तलावात फेकलेला मृतदेह सापडल्याने उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये खळबळ उडाली आहे. हात-पाय बांधून तरुणाच्या शरीराची चाळण करण्यात आल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत.
ADVERTISEMENT
UP Crime : उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात एका तरुणाची हत्या (Boy Murder) करून त्याचा मृतदेह तलावात फेकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी या हत्येची माहिती देताना सांगितले की, अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. प्रतापगड (Pratapgad UP) जिल्ह्यातील असपूर देवसरा पोलीस स्टेशन परिसरात एका तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह तलावात फेकण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे आता त्याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
लग्नासाठी गेला अन्..
प्रतापगडचे पोलीस अधीक्षक सतपाल अंतील यांनी या हत्याकांडाची माहिती देताना सांगितले की, असपूर देवसरा पोलीस स्टेशन हद्दीतील अकरीपूरमधील 22 वर्षीय अनुराग मिश्रा 23 नोव्हेंबर रोजी रात्री एका लग्नात सहभागी होण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र त्यादिवसांपासून बेपत्ताच असल्याचे घराच्यांनी सांगितले होते.
हे ही वाचा >> Video : मोहम्मद शमी ठरला देवदूत! भयंकर कार अपघातात वाचवला लाख मोलाचा जीव
कुटुंबीयांना मानसिक धक्का
अनुराग मिश्रा बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी दिल्यानंतर पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी तपास सुरू केला होता. मात्र शनिवारी सायंकाळी उशिरा त्याचा मृतदेह त्याच्या घरापासून अगदी 300 मीटर अंतरावर असलेल्या तलावात आढळून आला. अनुरागचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या घरातील सदस्यांनाही धक्का बसला आहे. लग्नासाठी बाहेर पडलेला अनुराग मिश्राची हत्या झाल्याचे कळताच त्याच्या कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे.
हे वाचलं का?
अनुराग रक्ताच्या थारोळ्यात
पोलिसांना ज्यावेळी अनुराग मिश्राचा मृतदेह सापडला होता. त्यावेळी त्याचे हात-पाय बांधलेले होते. त्यानंतर ज्या ठिकाणी त्याचा मृतदेह सापडला होता, त्या ठिकाणी तपासणी केली असता त्या ठिकाणी रक्ताचे डाग पडलेले दिसून आले. अनुरागच्या हत्येप्रकरणी आता गुन्हा अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचे कोणाबरोबर वाद होते का किंवा त्याचे शत्रू होते का असा तपास पोलीस करत आहेत.
हे ही वाचा >> मुलाच्या प्रेयसीला भर रस्त्यात केलं विवस्त्र, महिला सरपंचाचं तालीबानी कृत्य
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT