Wardha Crime : अंगणात पडला रक्ताचा सडा! तरुणी घराबाहेर येताच ‘त्यांनी’ चिरला गळा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Nagpur Crime News In mutton shop Shopkeeper stabbed shopper by Chopper
Nagpur Crime News In mutton shop Shopkeeper stabbed shopper by Chopper
social share
google news

Wardha Crime: वर्ध्याच्या दहेगाव गोसावी (Dahegaon Gosavi) येथे रात्री युवतीची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे युवतीला घराबाहेर बोलवून तिच्या गळ्यावर चाकूने वार (knife attack) केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात चौघांना (four arrested) ताब्यात घेतलं आहे. तरुणीवर वार करुन 4 जण पळून जाताना ग्रामस्थांनी त्यांना पकडून आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

दहेगाव गोसावीत तणाव

हत्येच्या घटनेमुळे दहेगाव गोसावी येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील दहेगाव गोसावी येथे 23 वर्षीय युवती घरी असताना तिला घराच्या बाहेर बोलावून हत्या करण्यात आली आहे. या थरारक घटनेने दहेगाव गोसावी येथे तणावाचे वातावरण पसरले असून ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे घडली याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही.

हे ही वाचा >> India Today Conclave Mumbai 2023 : शिंदे, पवार, फडणवीसांसोबत राजकीय गप्पा, ‘या’ सेलिब्रिटी लावणार हजेरी

घरात एकटी असतानाच…

वर्ध्यातून दोन तरुण दहेगाव गोसावीमध्ये एकत्रच आले होते. त्यांच्यासोबत दोन मुलीदेखील होत्या. तरुणांनी दोन मुलींना घराच्या गेटजवळून युवतीला हाक मारण्यास सांगितली. तिला हाक मारल्यानंतर रात्रीच्या वेळी युवती घराबाहेर अंगणात आली. त्यावेळी मागून आलेल्या युवकांनी तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. तरुणीवर हल्ला होताच तिने आरडाओरड करताच घरातील सदस्य घराबाहेर आले. त्यावेळी युवती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यानंतर जखमी युवतीला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान युवतीचा मृत्यू झाला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Hemant Patil : शिंदेंच्या खासदाराला स्टंटबाजी भोवली! पोलिसांनी दाखल केला अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

चौघांना ताब्यात

तरुणीवर चाकूने वार करुन पळ काढणाऱ्या दोन युवकांसह सोबतच्या दोन मुलींचा गावकऱ्यांनी पाठलाग करुन त्यांना पकडण्यात आले आहे. या हल्यात जखमी तरुणीला रुग्णालयात दाखल करुनही तिचा मृत्यू झाल्यानंतर गावातील वातावरण तापले
आहे. ग्रामस्थांनी चौघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या घटनेमुळे दहेगाव गोसावीमध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे.

याआधी प्राध्यापिका प्रकरण

या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये चीड निर्माण झाली आहे. यापूर्वी वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथे प्राध्यापिका जळीत प्रकरण घडले होते. त्यामुळं राज्यभरात खळबळ माजली होती. या घटनेमुळे देखील आता महिला सुरक्षेच्या बाबतीत प्रश्न निर्माण होत खळबळ निर्माण झाली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT