Crime : भांडणाचा वाद टोकाला गेला, संतापलेल्या नवऱ्याने….रक्ताच्या थारोळ्यात सापडली बायको
नवऱ्याला अंमलीपदार्थांचे सेवन करण्याचे व्यसन होते, त्यामुळे बायकोने ते व्यसन करण्यास विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या नवऱ्याने थेट तिसऱ्या मजल्यावरून बायकोला खाली फेकून ठार मारल्याची घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
Uttar Pradesh : दिल्लीजवळ लागून असलेल्या गाझियाबादमधील गोविंदपुरममध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पती-पत्नीचा वाद झाल्याने नवऱ्याने पत्नीला तिसऱ्या मजल्यावरून फेकून मारल्याची (Murder) भयंकर घटना घडली आहे. मृत महिलेच्या आई वडिलांनी आरोप केला आहे की तिचा नवरा हा व्यसनी होता. तो अंमली पदार्थांचे सेवन करत होता, त्यावरूनच त्यांच्यामध्ये वाद होत होता. या प्रकरणी आता पती, दीर, सासू, मेहुणी यांच्याविरुद्ध हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
नवरा ड्रग अॅडिक्ट
पोलिसांनी सांगितले की, बरौत येथील रहिवासी असलेल्या शालूचे लग्न गोविंदपुरम येथील विकासबरोबर झाले होते. मात्र लग्नानंतर सासरच्यांनी हुंड्यासाठी शालूचा छळ सुरू केला होता. मृत महिलेच्या भावाने सांगितले की, शालूचा नवरा हा ड्रग ॲडिक्ट आहे. त्यामुळे शालू त्याला विरोध करत होती, त्यावरून त्याने तिला अनेकदा मारहाणही केली आहे.
हे ही वाचा >> Nitesh Rane : “पोलीस माझं काही वाकडं करु शकत नाही, आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय”
तिसऱ्या मजल्यावरून फेकले
शुक्रवारीही शालूला सासरच्या मंडळींनी मारहाण केली होती, त्यानंतर शालूच्या माहेरच्या मंडळींनी हा वाद मिठवला होता. मात्र आनंदपालने सांगितले की, त्याच रात्री विकास आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला पुन्हा मारहाण केली होती व त्यानंतर तिला मजल्यावरून खाली फेकले होते, त्यातच तिचा मृत झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्याप्रकरणी आता माहेरच्या नातेवाईकांनी नवरा आणि त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हे वाचलं का?
अनेकदा मारहाण
या प्रकरणाची पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, शालूचा नवरा हा ड्रग अॅडिक्ट होता. त्यावरून पती-पत्नीमध्ये जोरदार वाद होत होते. त्यावरून त्याने अनेकदा तिला मारहाण केली होती. त्यामुळे हे प्रकरण पोलिसातही गेले होते. त्यावेळी मध्यस्थी करून हे प्रकरण मिठवले होते. 31 डिसेंबर रोजीही त्याने अंमली पदार्थाचे सेवन करून बायकोला मारहाण केली होती. मात्र त्यावेळीही समजूतीन हे प्रकरण मिठवले होते, मात्र आता सासरच्या मंडळींनी सगळ्यांनी मिळून तिची हत्या केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे.
हे ही वाचा >>फडणवीसांनी ओबीसी नेत्यांना सुनावलं, ‘मराठा आरक्षणात आम्ही सुवर्णमध्य…’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT